
Maharashtra Political News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची तरतूद नसणे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर कुठलेही भाष्य नसल्याने विरोधकांनी महाराष्ट्राच्या तोंडाला सरकारने पाने पुसली, अशी टीका करत नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे महायुती सरकारच्या मंत्री, आमदारांनी मात्र अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेणारा असल्याचे म्हणत स्वागत केले आहे.
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा विश्वासू सहकारी वाल्मीक कराड अडकल्याने त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षाचे नेते म्हणून अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा शेवटपर्यंत बचाव केला, मात्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तीन दिवसातच मुंडे यांचा राजीनामा घेतला. त्यामुळे धनंजय मुंडे अजित पवारांवर नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधानसभेत सादर केलेला अकरावा अर्थसंकल्प हा त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा परिपाक आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा हा अर्थसंकल्प शेती, ग्रामविकास, महिला सशक्तीकरण, पायाभूत सुविधा,आरोग्य,शिक्षण,रोजगार आणि पर्यावरणपूरक ऊर्जेला चालना देणारा आहे.
महाराष्ट्र आता थांबणार नाही असा संकल्प व्यक्त करणारा हा अर्थसंकल्प महाराष्ट्राला विकसित भारत, विकसित महाराष्ट्र या संकल्पनेच्या दिशेने वेगाने पुढे नेईल, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी 'एक्स' वर दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेत व्यक्त केला आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या भविष्याची पायाभरणी करणारा ठरेल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
राज्याचा 2025-26 या वर्षासाठी अर्थमंत्री अजित पवारांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्. आग्र्यामध्ये शिवाजी महाराजांचे तर छत्रपती संभाजी महाराजांचे संगमेश्वर या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच राज्यात परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खासगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृद्धी होणे आवश्यक आहे असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं. दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये राज्य शासनाव्दारे एकूण 63 कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे येत्या काळात 15 लाख 72 हजार 654 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यातून सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होईल, असा अंदाज अजित पवारांनी व्यक्त केला.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.