K Chandrasekhar Rao
K Chandrasekhar Rao sarkarnama
मुंबई

Marathwada News : मराठवाड्यातील 25 गावांनाही तेलंगणात सामील व्हायचयं..!

सरकारनामा ब्युरो

Marathwada News : मूलभूत सोयीसुविधा मिळत नसल्यामुळे सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामील होण्याचा इशारा देत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही सीमा भागातील गावांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत या गावातील जनतेत आहे.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असलेल्या ४८ गावांनी पाणी प्रश्नावरून थेट कर्नाटकात सामील होण्याचा इशारा दिला होता. यानंतर सीमाभागातील गावांमध्ये अस्वस्थता असून अनेक गावांतून असे इशारे दिले जात आहेत.कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पेटला असताना आता हो लोण मराठवाड्यापर्यंत पोहचले आहे.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातही सीमावादाचे लोण पसरले आहे. सीमेवरील धर्माबाद तालुक्यात असलेल्या २५ गावांनी आता तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिला आहे. प्रांत रचना होण्याच्या अगोदर हा संपूर्ण परिसर निजामकालीन हैदराबाद राज्यात होता.

या गावाचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांची एक बैठक नुसतीच बासर येथे झाली.नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, देगलूरकर आणि किनवट तालुक्यात सीमाभागात असलेली २५ गावे तेलंगण राज्यात सामील होण्याची मागणी यानिमित्ताने पुढे आली आहे.

धर्माबाद हा तालुका महाराष्ट्र- तेलंगण सीमेवर असून या तालुक्यात तेलगू भाषिकांची संख्या लक्षणीय आहे. या तालुक्यातील सीमेलगतच्या गावांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.आम्हाला मुलभूत सुविधा मिळत नसल्याचे या गावांच्या सरपंचाचे मत आहे. तेलंगण राज्यामध्ये सामील होण्याबाबत त्यांनी या बैठकीत अनुकूलता दर्शवली आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील 40 गावांवर दावा केला होता. तसेच त्यांनी अक्कलकोट आणि सोलापूरही कर्नाटकचाच भाग असल्याचेही सांगितलं.

जत तालुक्यातील 40 गावांना कर्नांटक सरकारने पाणी दिल्याने या 40 गावांनी कर्नाटकात विलीन होण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जत पाणी प्रश्वावर मोठा तोडगा काढला आहे. एकनाथ शिंदे यांनी तातडीने पाऊले उचलत जतमधील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तब्बल 2 हजार कोटींचं टेंडर काढणार असल्याची घोषणा केली आहे. यानंतर आता नांदेडमधील गावांनीही तेलंगणात सामील होण्याचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT