Maharashtra Cabinet Expansion:  Sarkarnama
मुंबई

Cabinet expansion : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री 'वर्षा' वर दोन तास खलबतं ; मंत्रीमंडळ विस्ताराबाबत..

Maharashtra Politics : ते रात्री दीड वाजण्याच्या सुमारात वर्षा बंगल्यातून बाहेर पडले.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा होत असताना राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला आहे.

सत्तेत आता राष्ट्रवादीलाही मंत्रीपदं द्यावी लागत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांचे टेन्शन वाढलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. (CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis held a discussion for two hours)

शिंदे गट आणि भाजपमधील काही आमदार नाराज असल्याचे वृत्त आहे. या नेत्यांची नाराजी दुर करण्यासाठी शिंदे-फडणवीस यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरु आहे. शनिवारी मध्यरात्री शिंदे-फडणवीस यांच्यात दोन तास सविस्तर चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले. या बैठकीत मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. सुमारे दोन तासांच्या चर्चेनंतर ते रात्री दीड वाजण्याच्या सुमारात वर्षा बंगल्यातून बाहेर पडले. दोघांमध्ये बंद दाराआड ही चर्चा झाली.

लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच महामंडळाचे वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबरोबर सोबत महामंडळाचे देखील लवकरात लवकर वाटप करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस यांच्याकडून करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस जरी सत्तेत सोबत आली असली तरी भाजप आणि शिवसेनेचे आमदारांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.

अजित पवार काही आमदारांसह सत्तेत नुकतेच सहभागी झाले. त्यांना लगेच मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. पण वर्षभरापासून मंत्री होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शिंदेसेना, भाजपच्या आमदारांना लटकवण्यात आले. याबद्दल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या रक्तात थेट बोलणे आहे. म्हणून मी बोलतो. आमचा विश्वासघात झाला, असे म्हणायला हरकत नाही.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT