Mumbai News : कल्याण पश्चिमच्या जागेवर भाजप दावा करत असून त्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसू नये. शिवसैनिक हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा शिवसेना एकनाथ शिंदे गटाने भाजपला दिला.
त्यावर भाजपने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सडेतोड उत्तर देत, 'पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा बोलू नका, ती कामं तुम्ही चांगली करता', असे बोल सुनावले आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात रविवारी भाजपचे जिल्हा सचिवांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी भाजप (BJP) कल्याण पश्चिम मतदारसंघाची मागणी केली. भाजपचे पदाधिकारी इथं ज्यापद्धतीने काम करत आहेत, त्यावरून वेगळंच मनसुभा दिसतोय. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला असून भाजपने पाठीत खंजीर खुपसले, तर शिवसैनिक सहन करणार नाही, असा इशारा मोरे यांनी दिला.
शिवसेनेला (Shiv Sena) आता भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सडेतोड उत्तर देत खडे बोल सुनावले आहे. माजी आमदारपवार म्हणाले, "शिवसेनेचे अरविंद मोरे यांनी जे विधान केलं आहे ते म्हणजे, महायुतीमध्ये मीठाचा खडा टाकण्याचा काम, मोरे करत आहेत. कोण कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. मोदीसाहेबांच्या पाठीत कोणी खंजीर खुपसले? लोकसभा निवडणुकीमध्ये याच उत्तर देणार का तुम्ही? तुमच्या किती लोकांनी इथं काम केलं? किती लोकांनी कपिल पाटील यांच्याविरोधात काम केलं? याचे पुराव्या आमच्याकडे आहेत".
"तुम्ही पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करू नका. कारण ते काम तुम्ही जास्त चांगले करता. तुम्ही पहिले सुधारा त्यानंतर भाजपला मार्गदर्शन करा. भाजप कधीही गद्दारी करणार नाही. भाजप महायुतीचा धर्म पाळणार. महायुतीचा जो निर्णय होईल, तो भाजपला जसा लागू आहे, तसा शिवसेनेला देखील लागू आहे", याची आठवण माजी आमदार आमदार नरेंद्र पवार यांनी करून दिली.
आम्ही भाजपचे काम करतो, मोदीसाहेबांच्या पक्षाचे काम करणं म्हणजे काय निवडणुकीची तयारी झाली का? पक्षाचा काम आम्ही करत आहोत. पक्ष ठरवेल उमेदवारी कोणाला द्यायची, कोणाला नाही. महायुतीमध्ये जो निर्णय होईल, त्यानुसार आम्ही त्या निर्णयाचा सन्मान करू आणि त्या निर्णयाचे 100 टक्के तंतोतंत पाळण्याचा आमचा मानस आहे, असेही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.