Eknath Shinde - Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : शिवाजी पार्कवर सेनेच्या दोन गटांत हमरी-तुमरी; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले...

Thackeray Vs Shinde : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

Deepak Kulkarni

Mumbai Politics News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने त्यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अभिवादन केले. यानंतर मुख्यमंत्री माघारी परतल्यानंतर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळासमोरच ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा झाला.

यात दोन्ही गटांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसेच एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. सध्या पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन शुक्रवारी आहे.

त्या दिवशी कोणताही संघर्ष, वाद नको म्हणून त्यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात आदल्या दिवशीच दर्शन घेतो. मी स्वत: आणि आमचे कार्यकर्ते शुक्रवारी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. आम्ही नतमस्तक झालो. त्यानंतर आम्ही निघालो.

शिंदे म्हणाले, आमचे कार्यकर्ते स्मृतिस्थळावरून निघत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी वातावरण, कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं. खरं तर तसं करण्याची आवश्यकता नको होती, असं शिंदेंनी सांगितले. याचवेळी पायाखालची वाळू सरकली म्हणजे सगळं गेलं, अशी भावना त्यांच्या मनात आहे. त्याचमुळे असा प्रकार सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली.(Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांचं कायदा सुव्यवस्था राखण्याचं आवाहन...

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या कार्यकर्त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्या यायचं होतं, पण त्यांनी मुद्दाम येऊन आमच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणं, महिलांना शिवीगाळ करणं, अश्लील हावभाव करणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मी कुठल्याही कार्यकर्त्याला आवाहन करतो की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे एक असं व्यक्तिमत्त्व होतं की, त्यांच्यासमोर सगळेच नतमस्तक होतो. आम्ही तर त्यांच्या विचारांची भूमिका घेऊन पुढे जातोय. त्यांच्या विचाराचं सरकार आम्ही स्थापन केलंय. मी मुख्यमंत्री म्हणून उद्या दर्शनाला जाऊ शकत नाही का? आम्ही दर्शन घेतल्यानंतर त्यांनी उद्या यायचं होतं, पण त्यांनी मुद्दाम येऊन आमच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घालणं, महिलांना शिवीगाळ करणं, अश्लील हावभाव करणं हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. मी कुठल्याही कार्यकर्त्याला आवाहन करतो की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी. कायदा-सुव्यवस्था राहिली पाहिजे,” असंही शिंदे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT