Sushma Andhare : '' शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ बाटवले'' ; सुषमा अंधारेंचा घणाघात!

Balasaheb Thackeray memorial : ...मग आता तुम्ही कमळाबाईची पालखी वाहणार का? असा सवालही उपस्थित केला आहे.
Sushma Andhare
Sushma AndhareSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar news : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर आज शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीनंतर एकूणच राजकारण तापले आहे.

यावर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कमळाबाईच्या नादाला लागलेल्या शिंदे गटाने बाळासाहेबांचे स्मृतिस्थळ बाटवले असल्याचा आरोप केला. तसेच, शिंदे गटाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही असे सुनावले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sushma Andhare
Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

नगर मध्ये आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणलेल्या 9 कोटींच्या कामांचा शुभारंभ आणि मध्यंतरी स्थगित केलेल्या युवा संघर्ष यात्रेची पुन्हा सुरुवात आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी चौंडीत करण्यात आली. या कार्यक्रमास सुषमा अंधारे उपस्थित होत्या.

यावेळी माध्यमांनी त्यांना मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटात ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर झालेल्या राड्या बाबत विचारले असता त्यांनी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना कमळाबाईची पालखी वाहण्यासाठी तयार केली नाही असे स्पष्ट केले होते. मग आता तुम्ही कमळाबाईची पालखी वाहणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

Sushma Andhare
Radhakrishna Vikhe News : राज्यात भाजपचं नेतृत्व कोण करणार? मंत्री विखेंनी घेतलं 'या' नेत्याचं नाव

आज बाळासाहेबांच्या विचारांवर दावा करणारे राहुल शेवाळे, दीपक केसरकर, भावना गवळी ही लोकं आम्ही कमळाच्या चिन्हावर निवडणुका लढवू असे म्हणत आहेत. एकीकडे हिंदुत्वाचा दाखला देतात आणि दिपावलीत मंगल पहाटही दंगल पहाट करतात, अशा लोकांनीच स्मृतिस्थळ बाटवले आहे, असा आरोपही यावेळी अंधारे यांनी केला आहे.

(Edited by- Mayur Ratnapakhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com