Disqualification petition against Manisha Kayande  Sarkarnama
मुंबई

Manisha Kayande Disqualify Petition : मनिषा कायंदेविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषेदेवर आमदार म्हणून गेलेल्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला. बाहेरून आलेले लोक पक्षात वरचढ ठरत आहेत, पण जुन्या लोकांची घुसमट होत होती, असं त्यांनी ठाकरेंचे साथ सोडण्याचे कारण सांगितले. मात्र, आता ठाकरे गटाकडून कायंदे यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचण्यात येणार, असे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरे गटाकडून कायंदे यांच्यावर अपात्रतेची मागणी करण्यात येईल, अशी शक्यता आहे. विधान परिषेदेचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याकडे ठाकरे गट कायंदेची सदस्यत्व काढण्याची मागणी करणार आहे. त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासाठी याचिका सादर करणार आहे, अशी शक्यता आहे.

ठाकरे गट याबाबत कायदेतज्ञांशी सल्ला मसलत करत आहे. कायदेतज्ञांशी चर्चा करून, अपात्रतेची याचिका दाखल करता यईल का? मनिषा कायंदे यांची कृती पक्षांतरकायदे अंतर्गत तरतूदींचा उल्लंघन ठरतं का? याबाबत चाचपणी करून पुढील दोन तीन दिवसात त्यांच्या विरोधात अपात्रतेची याचिका आणली जाणार आहे, असे ठाकरे गटातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Disqualification petition against Manisha Kayande)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT