Dombivali News
Dombivali News Sarkarnama
मुंबई

Dombivali News : "साहेब, मी गद्दार नाही..." शिवसेनेच्या 'त्या' बॅनरची शहरभर एकच चर्चा!

सरकारनामा ब्यूरो

Shivsena News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (BalaSaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त कल्याण शहरात शिवसेना शहर शाखेच्या वतीने बॅनर झळकविण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बाळासाहेबांना अभिवादन करणारी एक जाहीरात प्रसिद्ध केली. यातून 40 आमदारांना सूचक इशारा देखील देण्यात आला. ठाकरे गटाने आता इशारा देणारे बॅनर्स कल्याणमध्ये झळकवले आहेत. या बॅनरची एकच चर्चा शहरात रंगली आहे. "साहेब मी गद्दार नाही..." असे बॅनर उल्लेख आहे.

शिवसेना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी शहरात अभिवादनपर कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर, अन्नधान्य, फळ वाटप याचे ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांना खासदार संजय राऊतांनी अभिवादन केले असून, त्यांच्या त्या अनोख्या अभिवादनाची चर्चा राजकीय वर्तुळात, तसेच समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात होत आहे. राऊत यांच्या या अनोख्या अभिवादनाचे बॅनर शिवसैनिकांनी कल्याण मध्ये उभे केले असून, त्याची चर्चा आता शहरात रंगत आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार गेले. शिंदे गटासोबत गेलेल्या 40 आमदारांना गाडून पुन्हा नव्या उमेदीने उभे राहू, असे राऊत यांनी म्हटले आहे. याच संदेशाचे बॅनर आता कल्याण शहरातील शिवसेना शाखेच्या वतीने लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर "साहेब मी गद्दार नाही..." गेलेल्या 40 गद्दारांना गाडून पुन्हा त्याच उमेदीने उभे राहू, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने अभिवादन केले याचे समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल'' हा संदेश देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर लावण्यात आला असून, यांची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT