Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

Deepak Kesarkar मंत्री केसकर म्हणाले, दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, ते पूर्ण देशाला माहित आहे.
Deepak Kesarkar, Sanjay Raut
Deepak Kesarkar, Sanjay Rautsarkarnama

Karad News : बाळासाहेब ठाकरे Balasaheb Thackeray यांच्या विचारानेच आमची वाटचाल सुरु असून बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली आहे.एकच दिवस मला पंतप्रधान करा. ३७० कलम रद्द करतो, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केले. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या congress पुढाऱ्यांना कोण मिठी मारत असेल तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर Deepak Kesarkar यांनी संजय राऊतांवर Sanjay Raut केली आहे.

दीपक केसरकर साताऱ्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी ते कराडातील कार्यक्रमांत बोलत होते. लोकांनी दिलेल्या युती शासनाच्या विचारांपासून व (कै.) बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वापासून दूर गेलेल्यांनाच मदतीची गरज आहे, असे सांगून केसरकर म्हणाले, बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केली आहे.

युतीच्या विचारांबरोबर, हिंदुत्वाच्या विचारधारेबरोबर राहावे, अशी आम्ही मागणी केली होती. परंतु, त्यांनी विचारधारा सोडली आहे. एकच दिवस मला पंतप्रधान करा. ३७० कलम रद्द करतो, असे म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केले. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना कोण मिठी मारत असेल तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही.

Deepak Kesarkar, Sanjay Raut
Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या पाठपुराव्याला यश; विकासकामांना १२ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर

मंत्री केसकर म्हणाले, सावरकरांबद्दल अनुद॒गार सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, ते पूर्ण देशाला माहित आहे. असे असताना यात्रा काढणारे महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुद॒गार काढतात. महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही.

Deepak Kesarkar, Sanjay Raut
Udayanraje Bhosale :'नगरोथ्थान'च्या निधीवरून उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना टोला; म्हणाले,''काही टपून बसलेल्या...''

कुणाबरोबरही युती केली म्हणून जनता बरोबर राहत नाही. जनता विकासाबरोबर आहे. मोदी यांना नेता म्हणून जगात मान्यता मिळाली आहे. जी २० चे अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. ज्याच्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले त्या विचारांच्या विरोधात जाल असाल तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.

Deepak Kesarkar, Sanjay Raut
Satara : इंग्रजांना मदत करण्यासाठीच काँग्रेसचा जन्म होता : अजयकुमार मिश्रांची जहरी टीका

गद्दार, लाचार कोण, ते जनतेला कळेल आदित्य ठाकरे वयाने लहान आहेत. त्यांनी राजकारण बघितलेले नाही. स्वतःच्या ऑफिसमध्ये एक महिनाभरही गेलेले नाहीत. त्यांना राजकारण म्हणजे काय, लोकांची सेवा म्हणजे काय, हे समजणार नाही. त्यामुळे वाईट बोलणाऱ्यांना सौम्य भाषेत उत्तर दिले जाणार. पण, ते उत्तर असे असणार की खरी गद्दारी कुणी केली, पदासाठी कोण लाचार झाले. ते जनता पाहत आहे.

Deepak Kesarkar, Sanjay Raut
BJP News : ‘भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये टक्केवारीसाठीच फ्री-स्टाईल हाणामारी’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com