Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Thackeray Vs Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का; डोंबिवलीत शिंदेंच्या उपस्थितीत तरुणांचा शिवसेनेत प्रवेश

Shrikant Shinde News : लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे.

Mangesh Mahale

Dombivali : शिंदे गटातील खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोबिवलीतील अनेक तरुणांनी शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातो. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

रोज उठून शिव्या, शाप देणे, टीका करणे हे जे राजकारण सुरू आहे, त्याला कंटाळून लोकांनी विकासाच्या राजकारणाला प्राधान्य दिले आहे. विकासाचे राजकारण पाहून विविध पक्षांतले कार्यकर्ते, तरुण-तरुणी शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे सांगत शिंदेंनी ठाकरे, राऊतांना टोला लगावला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, "सर्वसामान्यांना राज्यात विकासाचे राजकारण पाहिजे आहे, सध्या राज्यात सरकारकडून जे काम होत आहे. त्याला प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत."

"शिवसेनेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आहे. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, रोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं, लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे," असे टीका शिंदे यांनी केले आहे.

"विकासाच्या राजकारणावर विकासकामं होत आहेत आणि हेच लोकांना अपेक्षित आहे. त्यामुळे लोक मोठ्या संख्येनं शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेला यश प्राप्त झालं आहे. लोकांना विकासाचं राजकारण आवडतं, रोज उठून एकमेकांना शिव्या घालणं, टोमणे मारणं, शिव्या शाप देणं आणि टीका करणं, लोकांना या गलिच्छ राजकारणाचा कंटाळा आला आहे," असं खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.

"लोकांना विकासाचे राजकारण पाहिजे जे काम महाराष्ट्रामध्ये होतंय त्याला प्रभावित होऊन अनेक तरुण शिवसेनेमध्ये प्रवेश घेत आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेशी जोडत राहतील," असे श्रीकांत शिंदे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT