RSS Branch Attack Case: सध्याला देशात प्रबळ असलेली राजकीय संघटना म्हणजे, भाजप! या भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, देखील देशाच्या कानाकोपऱ्यात शाखा स्वरुपात कार्यरत आहे.
भाजपच्या राजकीय संघटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विचारांचे बळ मिळते. शाखेच्या स्वरुपात विस्तारलेल्या संघाच्या डोंबिवलीमधील शाखेवर रात्री दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला असून, दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरातील चौधरी वाडी मैदानात आरएसएसच्या (RSS) वीर सावरकर शाखा सुरू करण्यात आली आहे. ही शाखा गेल्या काही महिन्यापासूनच सुरू झाली आहे. या शाखेत परिसरातील लहान मुलांचा मोठा सहभाग असतो.
शाखा अध्यक्ष संजू चौधरी आणि शिक्षक पवन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या शाखेवर काल रात्री अचानक दगडफेक करण्यात आली. परिसरातील आजूबाजूच्या जंगलातून आणि अंधाराचा फायदा घेत ही दगडफेक झाली. परिसरातील काही इमारतीमधून देखील ही दगडफेक झाल्याचा आरोप आहे.
शाखा सुरू असतााच, लहान मुलांवर ही दगडफेक झाल्याने खळबळ उडाली. शाखेतील मुलांनी प्रसंगावधान राखल्याने कोणीही जखमी झाली नाही. परंतु मुलांमध्ये या दगडफेकीमुळे दहशत निर्माण झाली आहे. शाखेवर झालेल्या दगडफेकीनंतर संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक रूप घेत, पोलिसांकडे धाव घेतली.
संघ आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शाखा अध्यक्षकांनी स्थानिक पोलिस ठाणे, टिळकनगर इथं धाव घेत, घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत, दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. दगडफेक करणारे कोण? त्यांचा उद्देश काय होता? याची चर्चा सध्या डोंबिवलीमध्ये सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाईची मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.