Ladki Bahin Scheme : '1500 चं' हातावर टेकवणाऱ्या महायुतीला केंद्रीय मंत्र्यांचा 'घरचा आहेर'

Ramdas Athawale On Mahayuti : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. तर प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रूपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप लाडक्या बहिणींना 2100 रूपये मिळालेले नाहीत.
CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून राज्याचा पहिला अर्थसंकल्पही आज (ता.10) मांडण्यात येणार आहे. पण राज्यातील लाडक्या बहिणींना प्रतिमहा 2100 रूपये देण्याचे वचन लाडक्या भावांनी काही अद्याप पूर्ण केलेलं नाही. यावरून विरोधकांनी महायुतीवर हल्लाबोल केला असतानाच केंद्रीय मंत्र्यानेदेखील महायुतीला 'घरचा आहेर' देत आश्वासनांची पूर्तता करा असा सल्ला दिला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. तर राज्यातील आर्थिक दुर्बल महिलांना 1500 रुपये देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे कोणतेच निकष न लावता 2 कोटींहून अधिक महिलांना याचा लाभ देण्यात आला. दरम्यान निवडणूक कालावधीत याच योजनेच्या रक्कमेत वाढ केली जाईल. 1500 ऐवजी 2100 रूपये महिलांना दिले जातील असेही आश्वासन महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी विविध सभा आणि कार्यक्रमातून दिले होते.

मात्र अद्याप 2100 रूपये काही लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी केली आहे. तसेच लाडक्या बहिणींना 2100 रूपये द्या असेही म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Scheme : महायुतीची महत्वाकांक्षी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना वादाच्या भोवऱ्यात; वित्त विभाग 'टेन्शन'मध्ये!

यावेळी राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजना या ना त्या कारणाने बंद केली जाईल अशी चर्चा सुरू आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिरोजीरवर फार मोठा बोजा पडतोय असेही म्हटलं जातेय. पण आता दावोस येथे विविध उद्योगांशी करार झाला असून राज्यात 15 लाख 90 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यामुळे आता राज्याची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 2100 देण्यात कोणतीच अडचण येणार नाही. ते मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूर्ण करावे, आठवले यांनी असे आठवले यांनी म्हटलं आहे.

सध्या माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्यासह त्यात बदल केले जातायेत अशा चर्चा रंगल्या आहेत. हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस करतायत असेही बोलल जातयं. पण त्या फक्त चर्चा असून हे सरकार फक्त एकनाथ शिंदे यांचे नसून महायुतीचे आहे. यामुळे कोणा एकाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नसून सरकारने दिलेल्या निर्णयांना स्थगिती दिल्याचे आठवले म्हणाले.

CM Fadnavis on Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीची सत्ता टिकली पण अर्थसंकल्पात आश्वासन पाळणार का?

यावेळी आठवले यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात भारतीय रिपब्लिकन पक्षाला स्थान न देण्यात आल्यावरून देखील नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळात आम्हाला एक मंत्रीपद मिळणे अपेक्षित होतं. मात्र ते मिळालेलं नाही. असो पण भविष्यात तरी एक मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतोय. पण आम्ही नाराज आहोत, असेही सत्य असल्याचेही आठवले म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com