Praful Patel Sarkarnama
मुंबई

Praful Patel News : राष्ट्रवादीला धक्का! शरद पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेलांवर ईडीची मोठी कारवाई

ED Action News : अनिल देशमुख आणि नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यानंतर ईडीच्या रडारवर प्रफुल्ल पटेल...

सरकारनामा ब्यूरो

Ncp Leader Praful Patel Properties Sealed : ईडीकडून काही दिवसांपूर्वी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व नातेवाईकांच्या घरी ईडीने छापे टाकले होते. तसेच मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेतही ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. आता ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का देत शरद पवारां(Sharad Pawar)चे अत्यंत विश्वासू समजले जाणाऱ्या प्रफुल्ल पटेलांवर मोठी कारवाई केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे वरळी येथील सीजे हाऊस इमारतीमधील चार मजले ईडीकडून जप्त करण्यात आले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने याबाबत माहिती दिली आहे. सील करण्याची कारवाई मागील वर्षीच करण्यात आली होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली ईडी(ED)च्या या कारवाईनंतर आता पटेल कुटुंबाला हे चारही मजले रिकामे करावे लागणार आहेत.

कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची आणि इतरांविरुद्ध दाखल झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं याच इमारतीतील इतर दोन मजलेही सील केले आहेत. हे दोन मजले इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाच्या मालकीचे आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) आणि नवाब मलिक,हसन मुश्रीफ यांच्यानंतर ईडीच्या रडारवर प्रफुल्ल पटेल आले आहेत. मनी लाँड्रिंग प्रकऱणात मलिक यांचे नाव कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले होते. त्यानंतर आता पटेल यांचे नाव दाऊदशी जोडण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी( दि.८) दुपारी ईडीचे अधिकारी वरळी येथील सीजे हाऊस याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी चौथा मजला सील केला.

काय आहे प्रकरण ?

प्रफुल्ल पटेल( Praful Patel) आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कंपनीनं सीजे हाऊस इमारत बांधण्यात आली होती. याच भूखंडावर कुख्यात तस्कर व गँगस्टर इक्बाल मिर्ची यांच्या मालकीची काही मालमत्ता होती. इमारत उभी राहिल्यानंतर त्यात इक्बाल मिर्चीच्या कुटुंबीयांना दोन मजले देण्यात आले होते. हे मजलेही ईडीनं मागील वर्षी सील केले आहेत.

याच प्रकरणात डीएचएफएलचे वाधवान बंधू कपिल आणि धीरज यांची चौकशी झाली असून कपिल वाधवान अटकेत आहे, तर धीरज वाधवान जामिनावर आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात पटेल यांची १२ तासांहून अधिक चौकशी करण्यात आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT