Uddhav and Rashmi Thackeray sarkarnama
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापर्यंत ED पाच वर्षांनी कशी काय पोहोचली? हे आहे उत्तर!

ED च्या कारवाईने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंचे (Rashmi Thackeray) बंधू श्रीधर पाटणकर यांच्या ताब्यातील सदनिका अंमलबजावणी संचालनालायने (ED) ताब्यात घेतल्यानंतर त्यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. त्यातून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा सामना आणखी कठोर होणार आहे. (ED takes action against Shridhar Patankar, brother of Rashmi Thackeray)

श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यापर्यंत ED कशी पोहोचली, हा महत्वाचा मुद्दा आहे. ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरात नीलांबरी गृहनिर्माण प्रकल्प पुष्पक बुलियन या कंपनीने उभारला आहे. पुष्पक बुलियन ही कंपनी पुष्कक ग्रुप ऑफ कंपनीजमधील एक कंपनी आहे. पुष्पक बुलियानच्या नीलांबरी प्रोजेक्टमध्ये साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या 11 सदनिका होत्या. श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यामुळे पाटणकर यांच्याच सदनिका जप्त झाल्या आहेत.

यातील पुष्पक बुलियन ही कंपनी महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आहे. या कंपनीच्या विरोधात 2017 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. या कंपनीच्या सुमारे 22 कोटी रुपयांच्या मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. या कंपन्यातील काही फंड पटेल यांनी वेगवेगळ्या फर्ममध्ये सायफन ऑफ केले किंवा वळविले. त्यातील नंदकिशोर चतुर्वेदी या डिलरपर्यंत ईडी पोहोचली. याने पण अनेक शेल कंपन्या काढून असे पैसे वळविल्याचे ईडीच्या लक्षात आले. पुष्पक ग्रुपच्या पुष्पक रिअॅलिटी या फर्ममधूून चतुर्वेदीच्या अनेक कंपन्यांच्या अकौंटमध्ये पैसे वळविण्यात आले. या चतर्वेुदीने M/s Humsafar Dealer Private Limited या कंपनीेने सुमारे 30 कोटी रुपयांचे कर्ज साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लिमिटेडला दिल्याचे निदर्शनास आले. ही साईबाबा कंपनी पाटणकरांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या कंपनीच्या 11 सदनिका ईडीने ताब्यात घेतल्या. जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे.

शरद पवार यांची टीका

ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर वाढला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. असा गैरवापर हा देशासमोर सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. ईडीच्या कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. ईडीच्या कारवायांचा कार्यक्रम कोणालातरी राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी हाती घेतला आहे, असे यातून दिसून येत आहे. स्पष्ट शब्दांत सांगायचे म्हणजे गेल्या पाच वर्षात इथं असलेल्या कुणालाही ईडी नावाची संस्था माहीत नव्हती पण आता ईडी गावागावात पोहोचलीय, अशी तिखट प्रतिक्रिया पवार यांनी सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे बोलताना दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT