राजकारण तापलं! मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यालाच 'ईडी'चा दणका

सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
CM Uddhav Thackeray
CM Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सक्त वसुली संचालनालयाने (ED) आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर (Sridhar Patankar) यांची 6.45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 11 सदनिकांचा समावेश आहे.

ईडीने करचुकवेगिरी प्रकरणी पुष्पक बुलियन आणि समूहातील इतर कंपन्यांच्या विरोधात 6 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने आधी महेश पाटील, चंद्रकांत पटेल आणि त्यांचे कुटुंबीय व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांची 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. पुष्पक ग्रुपमधील पैसे महेश पटेल यांनी पुष्पक रिअॅलिटीचे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या सहाय्याने इतर कंपन्यांत वळवल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

CM Uddhav Thackeray
मोठी घडामोड : अखिलेश यादव, आझम खान यांच्यानंतर आता योगींचाही राजीनामा

नंदकिशोर चतुर्वेदी यांनी बनावट कंपन्यांत हा पैसा वळवला होता. या कंपन्यांच्या माध्यमातून श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडला 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले. हे कर्ज सुरक्षित पद्धतीने देण्यात आलेले नव्हते. साईबाबा गृहनिर्मिती ही पाटणकर यांच्या मालकीची आहे. त्यामुळे या कंपनीच्या मालकीचे 11 फ्लॅट ईडीने जप्त केले आहेत. या फ्लॅटची किंमत 6.45 कोटी रुपये आहे. ईडीने ठाण्यात आज सकाळी मोठी कारवाई करीत 'नीलांबरी' प्रकल्पातील 11 फ्लॅट जप्त केले. हे फ्लॅट श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे मेहुणे आहेत. यापूर्वी मनी करचुकवेगिरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज याच मालमत्तेवर ईडीने कारवाई केल्याची माहिती आहे.

CM Uddhav Thackeray
लालूंची प्रकृती चिंताजनक; रांचीतून तातडीनं दिल्लीला 'एम्स'मध्ये हलवलं

सोमय्यांनी आधीही केले होते आरोप

कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी आधी केला होता. ''वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली, असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com