ED Raid On Sujeet Patkar : Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

ED Raid On Sujeet Patkar : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांच्या कार्यालयावर ईडीची धाड; काय आहे प्रकरण?

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : सुजीत पाटकर यांच्याशी संबंधित प्रकणांमध्ये आता सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीकडून धाड टाकण्यात आली आहे. सुजीत पाटकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जातात. कोव्हीड काळातील लाईफलाईन कंपनीच्या घोटाळा प्रकरणात ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दहापेक्षा अधिक ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. अनेक जण सध्या ईडीच्या रडारवर आहेत, अशी ही माहिती मिळत आहे. (ED Raid On Sujeet Patkar )

ईडीची ही कारवाई सकाळी सात वाजेपासून सुरू झाली आहे. अनेक आजा ईडीच्या रडरवर आहेत. कोव्हीडच्या काळात लाईफलाईन कंपनीच्या माध्यमाच्या संबंधी जे काही लोक आहेत, त्यांच्यावर ईडी कारवाई करू शकते. कोव्हीड प्रकरणातील काही घोटाळ्यामध्ये या कंपनीतील काही जणांचा समावेश आहे, असा ईडीचा कयास आहे.

दहा ठिकाणी धाड टाकलेल्या या कारवाईत मुंबईतील काही ठिकाणं आहेत. त्याचप्रमाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यातील काही ठिकाणं आहेत. या ठिकाणी ईडीचं पथक दाखल झालेले आहेत. मात्र यातील ठिकाणं नेमकी कोणती आहेत. याबाबत ईडीने अजूनही माहिती दिलेली नाही. दहा ठिकाणी ईडीची धाड सुरू आहे, अशी माहिती मिळत आहे. (Latest Marathi News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT