नवनीत बऱ्हाटे
ED News : संपूर्ण देशभर गाजलेल्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणात आता ईडीची एंट्री झाली असून, उल्हासनगरमधील महिला आरोपीच्या घरापर्यंत तपासाची सूत्रे पोहोचली आहेत. स्त्रीबीज तस्करीतून कमावलेल्या पैशांचा माग काढण्यासाठी ईडीचे पथक सक्रिय झाल्याने या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे नवे धागेदोरे उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपास सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी संबंधित उल्हासनगरमधील महिला आरोपीच्या घरी ईडीचे पथक दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारमधील सुभाष टेकडी परिसरातील दहा चाळ भागात सकाळी ईडीच्या पथकाने धडक दिली असून, संबंधित महिलेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू असल्याचे समजते. स्त्रीबीज तस्करीच्या माध्यमातून नेमकी किती आर्थिक उलाढाल झाली, या व्यवहारातून किती पैसा मिळविण्यात आला, तसेच या पैशांची देवाणघेवाण कोणत्या माध्यमातून करण्यात आली, याचा माग काढण्यावर ईडीने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.
स्त्रीबीज तस्करी प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची व्याप्ती किती मोठी आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचे आर्थिक संबंध आहेत का, संबंधित व्यवहारांमध्ये इतर व्यक्ती अथवा संस्थांचा सहभाग आहे का? याचीही चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ईडीच्या या कारवाईमुळे बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता असून, तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.