Road Scam : रस्त्याच्या कामात घोटाळा? तीनवेळा १२ लाखांचा खर्च, 14 वर्षे आंदोलन; मात्र प्रत्यक्षात रस्ताच नाही

Malvan Road Row : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील काळसे येथील भंडारवाडी ते धनगरवाडीत प्रशासनाचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून १४ वर्षांहून अधिक काळ आंदोलने आणि उपोषणे करूनही रस्त्याचे काम मार्गी लागलेलं नाही.
Malvan Road Row
Malvan Road Row
Published on: 
Updated on: 

Sindhudurg News : शासन दरबारी तब्बल तीनवेळा रस्त्यासाठी १२ लाखांचा निधी खर्ची पडल्याची नोंद आहे; मात्र प्रत्यक्षात रस्त्याचा साधा मागमूसही नाही. प्रशासनाचा हा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार तालुक्यातील काळसे येथील भंडारवाडी ते धनगरवाडी जोडणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत उघडकीस आला आहे.

गेली १४ वर्षांहून अधिक काळ आंदोलने आणि उपोषणे करूनही न्याय न मिळाल्याने हवालदिल झालेल्या धनगरवाडीतील ग्रामस्थांनी आता तातडीने रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

भंडारवाडी-धनगरवाडीकडे जाणारा हा रस्ता ‘मार्ग क्रमांक २६’ वर नोंद असलेला अधिकृत रस्ता आहे. मात्र, प्रत्यक्षात हा रस्ता अस्तित्वातच नसल्याने ग्रामस्थांना नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. आपत्कालीन परिस्थितीत किंवा आजारपणाच्या वेळी रुग्णांना मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी लाकडी डोलीचा आधार घ्यावा लागतो. तर दुसरीकडे, शाळकरी चिमुकल्यांना दररोज चिखल-मातीतून सुमारे दीड किलोमीटरची कसरत करावी लागत आहे.

Malvan Road Row
Ahilyanagar road scam : अहिल्यानगर महापालिकेत 400 कोटींचा भ्रष्टाचार; संजय राऊतांनी फोडला 'बाॅम्ब', थेट मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पत्र

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या वाडीतील जनतेला पायाभूत रस्त्यासाठी असा संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. दरम्यान, वारंवार चकरा मारूनही शासकीय यंत्रणा दाद देत नसल्याने धनगरवाडीकरांनी आपली व्यथा मांडली आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य व भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय संदीप गावडे यांच्या कानावरही हा गंभीर प्रकार घातला आहे.

रस्ता गायब कसा झाला?

तब्बल १२ हून अधिक घरांसाठी वापरल्या जाणाऱ्या या रस्त्यासाठी ग्रामस्थ सुनील वरक हे गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने लढा देत आहेत. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचा जनता दरबार, मानवाधिकार आयोग आणि थेट विभागीय आयुक्तांपर्यंत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ‘कागदोपत्री तीनवेळा निधी खर्ची दाखवून रस्ता गायब कसा झाला?’ असा संतप्त प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

Malvan Road Row
Bribe Case : 40 लाखांच्या लाच प्रकरणात फरार अतिरिक्त आयुक्ताला CBI कडून अटक

संबंधित जमीनमालक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ यांच्यातील जमिनीच्या वादामुळे रस्त्याचे काम रेंगाळले आहे. शासन दरबारी नोंद असली तरी तशा प्रकारची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे अडचणी येत आहेत.

— अर्पिता शेळके, ग्रामसेवक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com