Adv. Satish Uke Sarkarnama
मुंबई

फडणवीसांच्या सहकाऱ्यानं मला धमकावलं; सतीश उके न्यायालयातच रडले

जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने अटक कलेले अॅड. सतिश उके यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : जमीन गैरव्यवहारप्रकरणी अमलबजावणी संचालनालयाने (ED) अटक कलेले अॅड. सतीश उके (Satish Uke) यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. ईडीकडून त्यांना कोठडी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तर उके स्वत:च आपली बाजू मांडत आहेत. यावेली त्यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले. फडणवीस यांच्या सहकाऱ्याने आपल्याला धमकावल्याचं उके यांनी न्यायालयात सांगितले. आपली बाजू मांडताना उके यांना अश्रू अनावर झाल्याचे समजते.

ईडीने उके यांच्यासह त्यांचे बंधू प्रदीप यांना गुरूवारी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाची माहिती न्यायालयात देण्यात आली. जमीन गैरव्यवहार प्रकरणात दोन गुन्हे नोंदवले गेले आहे. खैरूनिसा शेख या महिलेच्या पतीचा मृत्यू झाल्यावर त्या महिलेवर दबाव टाकून महिलेच्या पतीने उकेंशी व्यवहार केला हे मान्य करण्यास सांगितले. यांसह विविध प्रकरणात आरोपीची कोठडी मिळून तपासाची गरज असल्याचा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला.

सतीश उके याच्यावतीने त्यांचे वकिल रवी जाधव या़नी ईडीच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला. उके हे व्यवसायाने वकील आहेत. अटकेनंतर उकेंना 24 तासात कोर्टात हजार करणे गरजेचे असताना ईडीने तसे केले नाही. जी कायदेशीर प्रक्रिया आहे ते ईडीचे अधिकारी पाळत नाहीत. अटकेचा मेमोही अद्याप दिलेला नसल्याचा युक्तीवाद जाधव यांनी केला. उके यांनीही स्वत: आपली बाजू मांडली.

माझा घरात मी झोपेत असताना बेडरूम मध्ये सीआरपीएफचे जवान AK 47 बंदूक घेऊन आले. माझे वडील आजारी आहेत. मी आधी आर्किटेक्ट होतो नंतर कायद्याचं शिक्षण घेऊन 2007 साली वकिली सुरू केली. मी फडणवीस आणि गडकरी यांच्या विरोधात खटले लढले आहे. माझ्यावर लोया यांच्या केस मध्ये दबाव टाकला गेला. मला फडणवीस यांच्या सहकाऱ्याने धमकावले, असा आरोप उके यांनी केला. यावेळी युक्तीवाद करताना उके यांना न्यायालयात रडू कोसळले.

दरम्यान, प्रदीप उके हे माजी पोलीस कर्मचारी असून त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आलेले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयातील माजी न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सतीश उके यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. तेव्हापासून ते चर्चेत आले होते. तसेच उके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये फडणवीस यांनी फौजदारी गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू आहे.

जमीन प्रकरणात उकेंवर गुन्हा

काही दिवसांपूर्वी उके यांच्यावर एका 60 वर्षीय वृध्देने आपल्याला धमकावरून जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. उके यांनी दीड एक जमीन स्वत:च्या व भावाच्या नावावर केल्याचा आरोप वृध्देनं केला होता. काही वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी उके यांना ताब्यात घेतलं होते. त्यांच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता ईडीने त्यांना अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT