Suraj Chavan Sarkarnama
मुंबई

Khichadi Ghotala : सूरज चव्हाणांना 'ईडी'चे समन्स; आज पुन्हा होणार चौकशी

Khichadi Ghotala : मुंबई महापालिकेने कोरोना काळात सूरज चव्हाण यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट या कंपनीला कोविड सेंटरच कंत्राट दिलं.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: खिचडी वाटपात झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी सुरु आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना पुन्हा आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सूरज चव्हाण हे युवासेनेचे सचिव आहेत. आदित्य ठाकरे यांचे ते निकटवर्तीय आहेत.

गुन्हे शाखेकडून काही दिवसांपासून खिचडी वाटपातील कथित गैरव्यवहाराची प्राथमिक चौकशी सुरु आहे. चव्हाण यांना आजच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच ईडीने कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरणी सूरज चव्हाण यांच्या घरी छापेमारी केली होती. आता या प्रकरणातही त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याने त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्याचे दिसत आहे.

यापूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार संजय राऊत, माजी मंत्री अनिल परब, माजी मंत्री रविंद्र वायकर यांना या त्या कारणाने अडचणीत आणून चौकशी झाली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा तरी प्रयत्न या केंद्र सरकारच्या यंत्रणेकडून केला जात नाही का अशी कुजबुज ऐकवयास मिळत आहे.

कोरोना काळात ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्थलांतरित मजुरांना खिचडी पॅकेट पुरवण्याचे कोट्यवधींचे कंत्राट मिळवले. लॉकडाऊन काळात मुंबईतील स्थलांतरित मजुरांना २५ लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते. यात १६० कोटींचा खिचडी घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. खिचडी पॅकेट पुरवण्याच्या नावाखाली ठाकरे गटाने पालिकेकडून ८.१० कोटी रुपये मिळाले. त्यातील ४ कोटी बोगस कंपन्यांना वळवण्यात आल्याचा दावाही सोमय्यांनी केला होता. ठाकरे गटाच्या नेत्यांनी बोगस कंपन्या आणि नेत्यांच्या नावावर हा कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला .

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT