ED Action In Mumbai  Sarkarnama
मुंबई

ED Action In Mumbai : 'ईडी' कथित कोविड घोटाळ्याची पाळेमुळे खोदणार? अधिकाऱ्यांवर आजही कारवाई सुरूच..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुंबईत कथित कोविड घोटाळाप्रकरणी काल (दि.२१ जून) रोजी सक्तवसुली संचलनालयकडून (ईडी) १५ ते १६ ठिकणी धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये कोविड काळात महापालिकेत कार्यरत असलेल्या अतिरिक्त आयुक्तांसह शिवसेना ठाकरे गट यांच्यांशी संबंधित व्यक्तिंचा समावेश होता. ईडीच्या या झटापट सुरू झालेल्या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. (Latest Marathi News)

ठाकरे गटातील संबंधित व निकटवर्तीय या ईडीच्या कारवाईमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. काल झालेल्या कारवाईनंतर पुन्हा आज सकाळी ईडीची कारवाई सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर आज ईडीची छापेमारी सुरू होती. या दोन्ही अधिकाऱ्यांचा थेट कोविडच्या कथित घोट्याळ्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

काल झालेल्या कारवाईत मुंबई पालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. खासदार संजय राऊत यांचे जवळचे मानले जाणारे, सुजीत पाटकर यांच्याही घरी धाडी टाकण्यात आली. यानंतर आदित्य ठाकरे यांचे अतिशय खास व्यक्ती सुरज चव्हाण यांच्या चेंबूप येथील घरावरही धाड टाकण्यात आली. विविध ठिकाणीएकूण 16 ठिकाणी छापेमारीची कारवाई झाली होती.

साडे सोळा तास छापेमारी :

सुरज चव्हाण यांच्या घराच सकाळी 9 वाजताच छापेमारीची कारवाई सुरू झाली. सकाळी 9 ते रात्री दीड वाजेपर्यंत ईडीचे धाडसत्र सुरूच होते. साडे तासांपेक्षा अधिक ही छापेमारी केली. इतकी दीर्घ कारवाई झाल्याने एकच खळबल उडाली. सूरड चव्हाणची कसून चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या कारवाईत ईडीला काही ठोस कागदपत्रे मिळाली का? याची माहिती मिळाली नाही.

ईडीकडून आज सकाळी पालिकेतली तेव्हाचे वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि त्या दरम्यान कार्यरत असलेले उपायुक्त रमाकांत बिरादार यांच्या घरीही छापेमारी केली आहे. आता या दोघांचीसुद्धा कसून चौकशी करण्यात येत आहे. कागदपत्रांची बारकाईने तरपासणा केली जात आहे.

अजून अधिकारी रडारवर -

राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या लाईफलाईन कंपनीला नियमबाह्य काँन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. या टेंडर बहाल करण्यामागे अधिकारीही होते का? याचा तपास केला जाणार आहे. ईडीच्या रडारवर तत्कालीन मुंबई पालिकेतील इतरही आणखी काही अधिकारी आहेत, अशी शक्यता आहे. (ED Action In Mumbai)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT