Eknath Khadse, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

Eknath Khadse On Devendra Fadnavis: खडसेंचा आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट; म्हणाले,' फडणवीसांनी राज्यपालपदाची ऑफर...'

Deepak Kulkarni

Mumbai News: राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही.तसेच कुणीच कुणाचा कायमचा शत्रूही नसतो, हेही गेल्या काही वर्षांमधील राजकीय घडामोडींनी दाखवून दिले आहे.एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय शत्रुत्व सर्वश्रुत आहेत. फडणवीसांवर टीकेची एकही संधी खडसे सोडताना दिसून येत नाही.याच खडसेंनी उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या फडणवीसांविषयी आजपर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली.त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांनी मला 2019 मध्ये आपल्याला राज्यपालपदाची ऑफर दिली होती, असा खळबळजनक विधान केलं आहे.हे आश्वासन त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन दिल्याचंही खडसे यांनी यावेळी म्हटलं.

एकनाथ खडसे म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी मला 2019 मध्ये एकदा बोलावून घेतले. त्या बैठकीला आम्ही दोघेच होतो.यावेळी फडणवीस म्हणाले, नाथाभाऊ तुमची राज्यपालपदासाठी मी शिफारस करतो.यावर आपण त्यांना देवेंद्रजी खरं सांगा, तुम्ही मला अनेकदा सांगितलं की, हे करणार, ते देणार, पण ते काही झालं नाही त्यामुळे माझा विश्वास बसत नसल्याचं सांगितलं.

या बैठकीत खडसेंनी राज्यपाल केले तर आनंदाची गोष्ट आहे, पण माझा विश्वास बसत नाही असं म्हटलं. यावर माझ्या एकुलत्या एक मुलीची शपथ घेऊन सांगतो, हा देवेंद्र फडणवीसचा शब्द आहे. मात्र,पुढे काय झालं, मला माहीत नाही पण देवेंद्र फडणवीसांनी मला राज्यपालपदाचं आश्वासन दिल्याचं आणि त्यासाठी मनापासून प्रयत्न करेन असंही सांगितलं होतं,असा दावा खडसेंनी केला आहे.त्यांनी ही गोष्ट साधारण 2019मधील असल्याचंही म्हटलं आहे.

'भाजपमध्ये जाण्याच्या निर्णयावर फुली..?'

एकनाथ खडसेंनी यावेळी रखडलेल्या भाजपप्रवेशावरही रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले, ज्यावेळेला मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, त्या काळात मला अजिबात तेथे जाण्याची इच्छा नव्हती. पण दिल्लीतल्या अतिज्येष्ठ नेत्यांनी मला फोन केल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.

तसेच जे.पी.नड्डा आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत आपला भाजप प्रवेश झाल्याचा पुनरुच्चार खडसेंनी केला.यावेळी रक्षा खडसेही उपस्थित होत्याचं त्यांनी सांगितलं.आता या घटनेला 5 ते 6 महिने उलटूनही भाजपनं माझा प्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा केली नाही. अजून मी वाट पाहतोय पण आजतागायत प्रवेशाविषयी काही घोषणा झालेली नाही.त्यामुळे यापुढे भाजपमध्ये जाण्याच्या आपल्या निर्णयावर फुली मारल्याचंही खडसेंनी जाहीर केलं.

आपण भाजपमध्ये प्रवेश घेतो असं कधी म्हणालो नव्हतो.तर प्रवेश घ्या असं आपण्यास सांगण्यात आल्याचंही खडसेंनी यावेळी स्पष्ट केलं.त्यानंतर शरद पवार आणि जयंत पाटलांशी चर्चा करुन भाजपमध्ये गेलो होतो.40 वर्षे भाजपचं काम केलं,पक्षासाठी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला.इतकं सगळ करूनही भाजपमध्ये मला प्रवेश द्या ही विनंती करणं ही बाब आपल्यासाठी अत्यंत अपमानास्पद असल्याची सलही आमदार एकनाथ खडसेंनी बोलून दाखवली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT