Dhangar Reservation : मी काय आमदार नाही; प्रत्येकानं मर्यादा ओळखून वागलं पाहिजे; प्रशांत परिचारक असं का म्हणाले?

Prashant Paricharak : धनगर समाजाचे पंढरपूरमध्ये गेली चार दिवसांपासून राज्यस्तरीय उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळाला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट देऊन आपण समाजासोबत असल्याचे सांगितले. याच वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे नेते डॉ अनिकेत देशमुख हेही परिचारक यांच्यासोबत होते.
Prashant Paricharak
Prashant Paricharak Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 13 September : धनगर समाजाला घटनेने दिलेल्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंढरपूर येथे धनगर समाज बांधवांकडून गेली चार दिवसांपासून उपोषण सुरू आहे. या उपोषणाला भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट दिली, त्या वेळी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर सरकारकडे मध्यस्थी करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी काय आमदार नाही, त्यामुळे प्रत्येकाने आपली मर्यादा ओळखून वागलं पाहिजे, अशी काहीशी हताश भूमिका मांडली.

धनगर समाजाचे (Dhangar community) पंढरपूरमध्ये (Pandharpur) गेली चार दिवसांपासून राज्यस्तरीय उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळाला माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आज भेट देऊन आपण समाजासोबत असल्याचे सांगितले. याच वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्याचे नेते डॉ अनिकेत देशमुख हेही परिचारक यांच्यासोबत होते.

या भेटीवेळी पत्रकारांनी माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांना धनगर आरक्षणाच्या मुद्यावर तुम्ही सरकार आणि धनगर समाजाच्या मुद्यावर मध्यस्थी करणार का, असा सवाल केला. त्या वेळी मी काय आता आमदार नाही, असे सांगितले. पत्रकारांनी तुम्ही आमदारापेक्षा कमी नाहीत, असं म्हटलं असता त्यांनी ‘तसं नसतंय, प्रत्येकाला मर्यादा आहे. आपण आपली मर्यादा ओळखून वागलं पाहिजे, अशी भूमिका मांडली.

Prashant Paricharak
Bhagirath Bhalke : भगीरथ भालकेंनी वाढविले महाआघाडीचे टेन्शन; विधानसभा निवडणुकीबाबत घेतला मोठा निर्णय...

याच वेळी डॉ. अनिकेत देशमुख यांनी आम्ही तर महाविकास आघाडीकडून आहोत, असे सांगितले. महाविकास आघाडीची भूमिका काहीही असली तरी आम्ही समाजासोबत आहे. धनगर आणि धनगड एकच आहे. मात्र, धनगड समूहच राज्यात आढळलेला नाही. आमची मागणी नवी नाही, आम्हाला घटनेने दिलेले आहे.

इच्छाशक्तीअभावी आतापर्यंत धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. आम्हाला कोणावरही चिखलफेक करायची नाही. पण आमचं जे हक्कांचं आहे, ते आम्हाला दिलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्येही धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी होईल, असे सांगितलं होतं. पण त्यांच्याकडून दिलं गेलं नाही, असेही डॉ देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.

Prashant Paricharak
Jayant Patil : जयंतराव जुनाच डाव टाकणार; विरोधकांमधील वजीर हेरून ‘राजा’ला चेकमेट देण्याची खेळी

आता हे सध्या सुरू असलेले उपोषण आरक्षणाच्या मुद्याची तड लागेपर्यंत चालू राहणार आहे. सरकारने धनगर समाजाचा आता अंत पाहू नये. सर्वपक्षीय बैठक बोलावून निर्णय घ्यावा. विधानसभा आणि विधान परिषदेत ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी डॉ. अनिकेत देशमुख यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com