Eknath Shinde, Nana Patole Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : राज्यात कुणाला कौल? महायुती अन् आघाडीतील दिग्गजांकडून विजयाचा दावा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा पाचवा म्हणजे अखेरचा टप्पा सोमवारी (ता. 20) पार पडत आहे. त्यापूर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीकडून सर्वात जास्त जागा मिळण्याचा दावा केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 'मिशन 45' यशस्वी होणार असल्याचे सांगितले, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लोकांमध्ये भाजपविरोधात हवा असल्याने आघाडीला कौल मिळणार असल्याचे स्पष्ट केले. लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच सुरू झालेल्या विजयाच्या दाव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. Maharashtra Politics

राज्यात सोमवारी मुंबईतील Mumbai सहा जागांसह ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तेरा जागांसाठी मतदान होत आहे. आतापर्यंत झालेल्या टप्प्यांसह शेवटच्या टप्प्यातही आपणच बाजी मारणार, असा दावा मुख्यमंत्री शिंदे आणि पटोलेंनी केला आहे. दरम्यान, या निवडणुकीचा निकाल ४ जूनला येणार असला तरी आताच होणाऱ्या दावे - प्रतिदाव्यातून राज्यात आकडेमोडीसह चर्चांचा अंदाज लावला जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे Eknath Shinde म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकारने सर्व घटकांसाठी खूप कामे केली आहेत. अल्पसंख्यांकांच्या मागण्यांची पूर्तता केली आहे. राज्यभर फिरून प्रचार करतना जाणवले की लोकांना विकास हवा आहे. आता महायुती सरकारने भरपूर विकासकामे केलेली आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीचे मिशन ४५ यशस्वी होईल, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाना पटोलेंनी Nana Patole मात्र राज्यासह देशात भाजपविरोधात वातवारण निर्मिती झाल्याचा फायदा आघाडीला होणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले,राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह Amit Shah, योगी आदी दिग्गज्जांनी सभा, रोड शो केले. मात्र त्यांचा कुठेही प्रभाव दिसून आला नाही. मोदींनी विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. युतीच्या नेत्यांनी विकासकामे केल्याचा आव आणत लोकांना समोरे गेले खरे, पण ती कामे त्यांना सांगता आली नाहीत. भ्रष्टाचार, केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर, बेरोजगारी, शेतकऱ्यांना वेठीस धरणे यामुळे लोकांमध्ये भाजपबाबत चीड आहे, असे स्पष्ट मत पटोलेंनी व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT