Eknath Shinde News : क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी तर राजकीय मैदानात विकेट; मुख्यमंत्री शिंदे नेमके काय म्हणाले

Uddhav Thackeray Vs Eknath SHinde Shivsens : शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबई कुणाची, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांची निवडणूक होत आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Maharashtra Political News : राज्यात लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा अखेरचा पाचवा टप्पा सोमवारी (ता. 20) पार पडत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात उतरत चौफेर फटकेबाजी केली. क्रिकेटचा आनंद घेतल्यानंतर त्यांनी राजकीय मैदानात आणखी विकेट घ्यायच्या असल्याने क्रिकेट खेळलो, असे सांगितले. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, अशा चर्चांना उधाण आले आहे. Eknath Shinde News

शिवसेनेत Shivsna फूट पडल्यानंतर मुंबई कुणाची, यावर ठाकरे गट आणि शिंदे गटात चढाओढ सुरू आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा जागांची निवडणूक होत आहे. यातील जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीने आपली सर्व ताकद लावली आहे. लोकसभेचा निकाल 4 जूनला लागणार असला तरी मुख्यमंत्री शिंदेंनी राजकीय विरोधकांची विकेट काढण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले.

पाचव्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार थंडावताच मुख्यमंत्री शिंदेंनी Eknath Shinde आपल्या नियमित कामांची सुरवात केली. त्यातून वेळात वेळ काढून त्यांनी क्रिकेटच्या मैदानाला भेट दिली. त्यावेळी ते आठ ते दहा चेंडू खेळले. त्या प्रत्येक चेंडूवर त्यांनी फटकेबाजी केली. त्यानंतर राजकीय मैदानात अनेक विकेट घ्यायच्या आहेत. त्यामुळे क्रिकेटचा आनंद घेतला, असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Praful Patel News : होय, भाजपमध्ये जाण्याचा आग्रह धरला; पवारांच्या गौप्यस्फोटानंतर पटेलांचीही कबुली

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह नाशिक, दिंडोरी, धुळे, भिवंडी, पालघर या जागांवर मतदान होत आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, पवार यांनी, तर आघडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार Sharad Pawar, उद्धव ठाकरेंनी खिंड लढवली.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde
Kunar Hembram News : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदाराचा ‘तृणमूल’मध्ये प्रवेश

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com