Mumbai News, 19 Apr : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम मानव यांनी नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना एकनाथ शिंदें आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकवायचा म्हणून हे प्रकरण उत्तम प्रकारे हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
श्याम मानव यांनी या प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचे आभार मानत टोला लगावला आहे. ते म्हणाले, "खरातचं आणि एकनाथ शिंदे यांचं कनेक्शन असल्यानेच या प्रकरणाचा सर्वार्थाने तपास सुरु झाला. खरात प्रकरण घरोघरी पोहचलं यासाठी एकनाथ शिंदेंचे आभार मानले पाहिजेत.
कारण खरात जर एकनाथ शिंदेंचा बाबा नसता आणि रूपाली चाकणकर खरातच्या भक्त नसत्या तर कधीच हे प्रकरण उघड झालं नसतं, असंही ते यावेळी म्हणाले. शिवाय हे दोघे नसते तर कदाचित हे प्रकरण पोलिसांना त्यांच्या पातळीवर दाबण्याच्या सूचना मिळाल्या असत्या. मात्र, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी हे प्रकरण उत्तम प्रकारे प्रकरण हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या.
शिंदे आणि चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळेच या प्रकरणाचा तपास करू देत आहेत", असा मोठा दावा देखील श्याम मानव यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असून शिंदेंना अडकवण्यासाठी हे प्रकरण खरंच बाहेर काढलं गेलं का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, सध्या देशात इतकी भयावह परिस्थिती आहे. एखाद्या महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग घडतात. मात्र, याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करत आहेत, अशी खंत देखील श्याम मानव यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.