

Congress News : महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले. त्यावरून माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मोदी सरकारला क्रेडिट जाऊ नये म्हणून केवळ राजकीय हेतून हे बिल पास होऊ दिलं नाही, असा थेट दावा त्यांनी केला आहे.महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेसला महिला धडा शिकवतील, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'ज्या काँग्रेस पक्षाशी आपले वडील स्व. शंकरराव चव्हाण साहेब आयुष्यभर एकनिष्ठ राहीलेत, त्याच काँग्रेस पक्षासोबत आपण गद्दारी करण्याअगोदर २०२३ मध्येच, “नारी शक्ती वंदन अधिनियम - २०२३”, म्हणजेच लोकसभा व विधानसभेच्या जागांमध्ये महिलांसाठीचे ३३% आरक्षण हे संसदेत एकमताने (कॉंग्रेसच्या पाठींब्याने) मंजूर झालेले आहे. ते १६ एप्रिल २०२६ पासून लागू ही झाले आहे.', असे काँग्रेसने म्हणत अशोक चव्हाणांना डिवचले.
'आपल्या माहितीसाठी, ज्यांच्यामुळे आपण पहिल्यांदा लोकसभेच्या सभागृहात निवडून गेलात त्या स्व. राजीव गांधी यांनीच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ३३ % आरक्षण लागू केलं व नंतर ५० % आरक्षण ही काँग्रेसच्याच काळात लागू करण्यात आलं. खाल्लेल्या मीठाला जागायला शिका, पाठीचा कणा थोडा तरी मजबूत असू द्या!', असा प्रहारी चव्हाण यांच्यावर काँग्रेसने केला.
राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू व अनाठाय़ी भूमिकेमुळे या प्रयत्नात अडसर आणला गेला आहे. विरोधी पक्षांच्या सर्व शंका-कुशंकांना केंद्र सरकारने ठोस उत्तरे दिली. विरोधी पक्षांना हवे असेल तर सर्व राज्यांमध्ये सरसकट ५० टक्के लोकसभा मतदारसंघ वाढीबाबत सुधारणा आणण्याची तयारी गृहमंत्री मा. अमितजी शाह यांनी लोकसभेत व्यक्त केली.परंतु, विरोधी पक्षांची एकंदर भूमिका लक्षात घेता त्यांना देशातील कोट्यवधी महिलांपेक्षा स्वतःचा राजकीय अहंकार महत्वाचा वाटला. त्यामुळेच सदर घटना दुरुस्ती विधेयकांना लोकसभेची मंजुरी मिळू शकली नाही. विरोधी पक्ष ज्याला आपला विजय समजत आहेत, तो दुर्दैवाने देशातील नारीशक्तीच्या हितांचा पराभव आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.