BJP leaders join Eknath Shinde-led Shiv Sena faction in Mira Bhayandar Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका; युतीमधील अलिखित कराराला तडा; भाजपचे नेते फोडले

Mira Bhayandar politics : मिरा भाईंदरमध्ये भाजपचे नेते शिंदे गटात गेल्याने भाजप-शिंदे युतीतील अलिखित कराराला तडा गेला असून महापालिका निवडणुकीआधी राजकीय तणाव वाढला आहे.

सरकारनामा ब्यूरो

प्रकाश लिमये

Mira Bhayandar news : एकमेकांचे नेते, पदाधिकारी पक्षात घ्यायचे नाहित असा अलखित करार भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात झाला आहे. मात्र मिरा भाईंदरमध्ये या परस्पर सामंजस्याला तडा गेला आहे. भाजपचे दोन नेते पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात सामील झाले आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर उमेदवारीसाठी भाजपमध्ये इच्छूकांची भाऊ गर्दी झाली आहे. परिणामी अनेकांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वाटत नसल्याने त्यांनी पक्षबदलाला सुरुवात केली आहे.

कल्याण डोंबिवलीसह ठिकठिकाणचे शिंदे गटाचे दिग्गज नेते पक्षात घेण्यास भाजपने सुरुवात केली होती. त्यावरुन शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. ही धुसफुस भाजपच्या थेट दिल्लीतील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचली. त्यानंतर चक्रे फिरली व एकमेकांचे नेते, पदाधिकारी पक्षात घ्यायचे नाहित असा निर्णय राज्य पातळीवर घेण्यात आला आहे.

मिरा भाईंदरमध्ये मात्र हा निर्णय मोडित निघाला आहे. भाजपचे मिरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सूर्वे यांनी नुकताच परिवहानमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश घेतला. प्रसाद सूर्वे काही वर्षांपूर्वी महराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र सहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विद्यमान आमदार नरेंद्र मेहता यांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जाऊ लागले. पक्षात त्यांना उपाध्यक्ष पदही देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपसून महापालिका निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. भाजपमध्ये इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. त्यानंतर उमेदवारांची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र उमेदवारी देण्याचे निश्चित झालेल्यांना काम सुरु करण्यास पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

या पार्श्वभुमीवर सूर्वे यांना अथवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याबाबत कोणतेही ठोस आश्वासन पक्षाकडून मिळाले नाही. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने आपण शिवसेनेत प्रवेश केलेला नाही. मात्र शिवसेनेत अपल्याला योग्य मानसन्मान देण्यात आला आहे. त्यामुळे आपण शिवधनुष्य खांद्यावर घेतले अशी प्रतिक्रिया सूर्वे यांनी दिली.

प्रसाद सूर्वे यांच्या पाठोपाठ भाजपचे जिल्हा सचिव राजन पांडे यांनी देखील शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. तर भाजपचे आणखी एक नेते अजय सिंह राजपूत यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता यावर भाजपकडून कोणतीही कुती केली जाते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे. उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विविध पक्षांचे आणखी काही नेते, पदाधिकारी कोलांट उद्या मारण्याची दाट शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT