Eknath Shinde : uddhav Thackeray ; Anandrao Adsul Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून याआधीही दोन-तीन वेळा बंडाचा प्रयत्न : शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट !

Eknath Shinde news : "शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर आपण गप्पं बसायचं नाही.."

सरकारनामा ब्यूरो

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड, शिवसेना पक्षातलं अभूतपूर्व बंड यावर नेहमीच चर्चा होत असतात. याबाबत अनेक नते वेगवेगळे दावे केले जातात. यासाठी वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. या बंडामागे भाजपसारख्या महाशक्तीचा हात असल्याचे बोलले जाते, तर ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कार्यशैली जबाबदार होती, अशी ही चर्चा केली जात. मात्र या अभूतपूर्व बंडापूर्वी शिंदेंनी दोन ते तीन वेळा बंडाचा प्रयत्न केला असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेत्यानेच केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून दोन तीन वेळा बंडाचा प्रयत्न झाला. मात्र त्यावेळी त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, असा मोठा गौप्यस्फोट शिंदे याच्या शिवसेनेचे नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी केला. इतकेच नव्हे तर यापूर्वीही शिंदेंनी शिवसेनेच्या आमदारांना दोन तीन वेळा घेऊन गेले होते, असा खळबळजनक दावाही अडसूळ यांनी केला आहे.

अडसूळ म्हणाले, "शिवसेनाप्रमुख यांचे चिरंजीव कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही मार्गाने मुख्यमंत्री होत आहेत, तर आपण गप्प बसणं योग्य नाही. आतून त्यांना सांगायचं काम करत होते, हे त्यांना पटत नव्हतं. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना घेऊन गेलेले होते, एकदा नाही दोन तीन वेळा. परंतु त्याला कुठलाही प्रतिसाद मिळाला नव्हता. कुठेतरी मनाला सल होती की, आफण चुकतोय. पण त्यापलीकडे जाऊन तुम्हाला मुख्यमंत्रीपद या त्या मार्गाने मिळालं. मग तुम्ही ते कसं राबवलंत?" असे अडसूळे म्हणाले आहेत.

संजय राऊत यांनी केला होता गौप्यस्फोट :

दरम्यान आनंदराव अडसूळांच्या या दाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हे बंडाची बीजे गेल्या तीन साडेतीन वर्षापासूनच रूजवली जात होती. माझ्या माहितीनुसार, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतानाही हा प्रकार सुरू होता. तेव्हा हे सगळे लोक काँग्रेसचे अहमद पटेल यांना भेटून पक्ष सोडण्याच्या तयारीत होते, असे संजय राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT