Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Vijay Shivtare Vs Ajit Pawar : अजितदादांना थेट नडणाऱ्या शिवतारेंना मुख्यमंत्री शिदेंनी तब्बल सहा तास ताटकळवलं!

Eknath Shinde : थोड्या दिवसांतच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा व्याप वाढला आहे. ते काम करणारे मुख्यमंत्री आहेत

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Political News : अजित पवार उर्मट आहेत. त्यांनी पुरंदरच्या जनतेचा आपमान केला, आता त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे, असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारेंनी बारामती लोकसभा लढवण्याचा चंग बांधलेला आहे. यावर अजित पवार गटाकडून ठाण्यात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच आव्हान देण्याची भाषा केली. यावरून महायुतीत वातावरण तापल्याचे दिसून आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर शिंदेंच्या भेटीला गेलेल्या शिवतारेंनी एक नाही, दोन नाही तब्बल सहा भेट टाळत ताटकळत ठेवल्याचे समोर आले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे (Vijay Shivtare) काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री पवारांना आव्हान देत आहेत. 2019 मध्ये विधानसभेत पवारांनी ठरवून शिवतारेंना पाडले होते. आता लोकसभा निवडणुकीत बारामतीतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र एकाच घरातील उमेदवारांना गेले 50 वर्षे मतदान करत आलो आहे. बारामती लोकसभा हा पवारांचा सातबारा नाही. त्यामुळे आता त्यांना मतदान करण्याची गरज नाही, असे म्हणत शिवतारेंनी शरद पवार आणि अजित पवारांच्या उमेदावारांविरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. याचा फटका मात्र अजित पवारांना बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवतारेंच्या भूमिकेवरून ठाण्यातील अजित पवार (Ajit Pawar) गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केले. बारामतीतून शिवतारे निवडणूक लढले तर ठाण्यातील निवडणूक शिंदेंना जड जाईल, असा इशाराच राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपेंनी दिला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी एकनाथ शिंदेंनी भेटीला आलेल्या विजय शिवतारेंना दिवसभर भेट टाळली. वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवतारे सकाळी भेट घेण्यासाठी गेले होते. तेथे शिंदेंनी (Eknath Shinde) तब्बल सहा तास शिवतारेंनी ताटकळत ठेवले. वर्षावर भेट मिळाली नसल्याने शिवतारे शेवटी शिंदेंच्या ठाण्यातील नंदनवन या निवासस्थानी गेले.

यावर शिवतारे म्हणाले, थोड्या दिवसांतच आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे त्यांचा कामाचा व्याप वाढला आहे. ते काम करणारे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यासाठी पाचच काय सात तासही वाट पाहण्याची आमची तयारी आहे. त्यामुळे गैरसमज नको. आता नंदनवन येथे त्यांना भेटूनच पुढील निर्णयावर बोलू, असे म्हणत शिवतारे ठाण्याकडे रवाना झाले. दरम्यान, बारामतीतून लढण्याची भूमिका घेतल्यानंतर महायुतीत ठिणगी पडली होती. यावरून शिंदेंनी ताटकळत ठेवत शिवतारेंना अप्रत्यक्षपणे धडाच दिला आहे. यातून अजित पवारांवरील विधाने आगामी काळात भोवणार असल्याचे सूचित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT