Sharad Pawar News : ना प्रवेश, ना तिकीट; पवार-लंके भेटीने उडवली अजितदादा-विखेंची झोप

Lok Sabha Election 2024 : अजित पवारांची साथ सोडली का, पवारसाहेबांच्या पक्षात आलात का, या पत्रकारांच्या प्रश्नांवर पवार आणि लंकेंनीही गोलगोल उत्तरे दिली.
Sharad Pawar,  Nilesh Lanke
Sharad Pawar, Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : नगरमधून खासदारकीचे गणित डोक्यात ठेवून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नीलेश लंके हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांच्या भेटीला येणार. ते साहेबांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, त्याचक्षणी त्यांना नगरमधून लोकसभेचे तिकीट मिळणार... या चर्चेवरून लंकेंनी राजकीय धुरळा उडवला. ठरल्याप्रमाणे लंके पुण्यातील पक्षाच्या ऑफिसमध्ये भेटायला आले.

साहेबांसह राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी लंकेचे स्वागत केले. पण, तिथे ना पक्ष प्रवेश झाला; ना लंकेंना तिकीट दिले. मात्र, साधारणपणे 25 मिनिटे लंकेंना शेजारी बसवून पवारसाहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरचे खासदार, भाजपचे उमेदवार सुजय विखेंची झोप मात्र उडवली.

विशेष म्हणजे, अजित पवारांची साथ सोडली का, पवारसाहेबांच्या पक्षात आलात का, या पत्रकारांच्या प्रश्नांवर पवार आणि लंकेंनीही गोलगोल उत्तरे दिली. परंतु, 'मी लहानपणापासून पवारसाहेबांचा चाहता असल्याचे सांगून, लंकेंनीही नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा इरादा लपवून ठेवला. (Latest Political News)

Sharad Pawar,  Nilesh Lanke
Uddhav Thackeray : 'भ्रष्टाचारी अभय योजना' ही मोदी गॅरंटी; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

लोकसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा बाळगून असलेले, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) खंदे समर्थक आमदार नीलेश लंकेंनी घड्याळ सोडून अखेर तुतारी हाती घेणार, तसेच लंके नगरमधून खासदार विखेंविरोधात महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे उमेदवार असणार, अशी चर्चा काही दिवसांपासून होती. त्यानंतर गुरुवारी लंकेंच्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत एकमेकांचे गोडवे गात लंकेंच्या पक्ष प्रवेश आणि लोकसभेच्या उमेदावारीच्या मुद्द्यांना बगल दिल्याचे पाहायला मिळाले.

Sharad Pawar,  Nilesh Lanke
Dharashiv Politics : धाराशिव बाजार समितीत सत्ताधारी-विरोधकांत राडा; कार्यालयाला टाळे, काय आहे कारण?

लंके म्हणाले, शरद पवारांचा (Sharad Pawar) देशातील विविध क्षेत्रात सिंहाचा वाटा आहे. ते अविरत कार्यरत असतात. कोविडच्या दोन्ही लाटांत शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर उभारून हजारो रुग्णांची सेवा केली. पवारांची विचारधारा कधीही सोडली नव्हती. आता यापुढेही पवारांच्या विचारधारेनेच काम करणार आहे. आज पुस्तक प्रकाशनासाठी आलो असून, राजकीय विधाने करण्याची ही जागा नाही. पवारांशी खासदारकी आणि निवडणुकांबाबत चर्चा झालेली नाही. तसेच लहानपणापासून शरद पवारांच्या भूमिकांचा अभ्यास करत आलो आहे. आमदारकीसाठी पवारांची अदृश्य ताकद लाभली. साहेब सांगतील तोच आदेश. तेच आमचे सर्वेसर्वा आहेत, असे म्हणत लंकेंनी तुतारी हाती घेतली की नाही, याबाबत स्पष्ट उत्तर देणे टाळले.

Sharad Pawar,  Nilesh Lanke
Lok Sabha Election 2024 : राम गोपाल वर्मांची राजकारणात एंट्री; दक्षिणेतील सुपरस्टारला भिडणार

शरद पवारांनीही लंकेंच्या (Nilesh Lanke) कामाचे कौतुक करत त्यांना गरज पडल्यास पाहिजे ती मदत करण्याचा शब्द दिला. ते म्हणाले, लंकेंच्या कामाचा झपाटा पाहून पक्षाने त्यांना विधानसभेला संधी दिली. त्यावेळी पारनेरला त्यांच्या प्रचाराला गेलो होतो. विजयी झाल्यानंतर त्यांनी लोकांची कामे प्रामाणिकपणे चालू ठेवली. ते लोकांसाठी काम करणारे नेते आहेत. त्यांचे कार्यालयात स्वागत करतो. पारनेरमध्ये अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असतात. काम करताना भविष्यात काही अडचणी आल्या तर आमची त्यांना साथ असेल, असे पवारांनी स्पष्ट केले. मात्र, लंके लोकसभेत की विधानसभेत दिसतील या प्रश्नावर पवारांनी लंके हे पारनेरमध्ये दिसतील, असे सांगत थेट उत्तर देणे टाळले.

दरम्यान, पुण्याकडे निघालेल्या लंकेंच्या ताफ्यात तुतारी, शरद पवार, सुप्रिया सुळेंचे स्टिकर लावले होते. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या निमित्त आज पुण्यात लंके, शरद पवार गटात प्रवेश करणार असे बोलले जात होते. प्रत्यक्ष भेटीत मात्र चित्र वेगळेच दिसले. त्यांचे कार्यालयात स्वागत आहे. लंकेंना मदत करणार असे पवार म्हणाले. तर राजकीय आणि पक्षप्रवेश, लोकसभा निवडणुकीबाबत काहीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. दोन्ही नेत्यांच्या या विधानांनी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे.

R

Sharad Pawar,  Nilesh Lanke
Nilesh Lanke News : प्रतीक्षा संपली, नीलेश लंकेंचं ठरलं? प्रचाराच्या ताफ्यात पवार, सुळे अन् तुतारी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com