Mahadev Jankar News : परभणीतून जानकरांची तयारी; आमदार गुट्टे धर्मसंकटात...

Lok Sabha Election 2024 And Ratnakar Gutte : परभणी लोकसभा मतदारसंघातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे निवडून आल्याने महायुतीच्या जागावाटपात पक्षाने परभणीची मागणी केली.
Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Ratnakar Gutte, Mahadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Parbhani Political News : राजकारणात पक्षनिष्ठा जपली जातेच, पण त्यापेक्षा अनेकदा मैत्रीधर्मही जपला जातो. पक्षाच्या मर्यादेत राहूनही मैत्रीधर्म जपल्याची अनेक उदाहरणे राज्यात आहेत. या दोन्हीचा सुवर्णमध्य गाठताना नेत्यांची तारांबळ उडते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघात केलेल्या तयारीने जिल्ह्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांना मोठ्या पेचात टाकले आहे. Mahadev Jankar News

जानकर (Mahadev Jankar) यांच्यासाठी प्रयत्न केले तर महायुतीच्या नेत्यांची नाराजी आणि महायुतीच्या उमेदवाराला समर्थन दिले तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांची नाराजी, अशा धर्मसंकाटात सध्या गुट्टे सापडल्याचे चित्र आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे निवडून आल्याने महायुतीच्या जागावाटपात पक्षाने परभणी लोकसभा मतदारसंघ रासपला देण्याची मागणी केली. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने त्यांनी परभणीतून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Sharad Pawar News : ना प्रवेश, ना तिकीट; पवार-लंके भेटीने उडवली अजितदादा-विखेंची झोप

महायुती आणि महाविकास आघाडी (MVA) अशा दोन्ही बाजूंनी ते चाचपणी करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींची बाजू प्रखरतेने मांडल्याने त्यांच्या उमेदवारीला ओबीसी मतदार पाठिंबा देऊ शकतात. जानकर यांची सारी भिस्त ओबीसी मतदारांवर आहे. भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार असलेल्या ओबीसी (OBC) मतदारांचा पाठिंबा जानकर यांना मिळाल्यास याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत.

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Kapil Patil News : 'राहुल गांधी येवो अथवा अन्य कोणी, भिवंडी लोकसभेच्या निकालात...' ; कपिल पाटलांचा दावा!

2019 च्या लोकसभा निवडणुकीचा इतिहास बघता महायुतीकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाऊ शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्याशी असलेले घनिष्ठ संबंध लक्षात घेता गुट्टे (Ratnakar Guttte) यांना महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रचार करणे अडचणीचे ठरणार आहे. विशेष म्हणजे परभणी महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर होण्याची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याचे बोलले जाते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक राजेश विटेकर यांची उमेदवारीही निश्चित मानली जात आहे. विटेकर आणि गुट्टे (Ratnakar Guttte) यांच्यात मैत्रीचे नाते आहे. गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विटेकर आणि गुट्टे यांच्यातील समन्वयाने सत्ता प्राप्त करण्यात आली. महायुतीकडून विटेकर उमेदवार असतील, तर त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणे हा एकीकडे मैत्रीधर्म असणार आहे. तर दुसरीकडे जानकर यांच्यासाठीचे काम पक्षनिष्ठा म्हणून असणार आहे. त्यामुळे अशा धर्मसंकटात सध्या गुट्टे सापडले आहेत. मात्र, यावर लवकरच तोडगा निघण्याची त्यांना अपेक्षा आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Ratnakar Gutte, Mahadev Jankar
Rahul Gandhi News: मोदी जनतेचा खिसा कसा कापतात; राहुल गांधींनी करून दाखविले प्रात्यक्षिक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com