Eknath Shinde, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या नेत्यांना 25 हजाराचे बक्षीस मिळणार; पण आमदारांची नावे फोडणार ?

Shivsena Vs Shivsena UBT : शिवसेना फुटल्यानंतर 40 आमदार ठाकरेंना सोडून गेले. त्यांना सत्तेत असल्याने फायदा होण्याची अपेक्षा होती. मात्र पक्ष फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काहीच फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीत अस्वस्थता पसरली. अपेक्षेपेक्षाही खूपच कमी जागा मिळाल्याने महायुतील घटक पक्ष एकमेकांकडे बोट दाखवू लागले. तर महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या पक्षासह काँग्रेसने घवघवीत यश मिळवले. त्यानंतर पक्ष फुटल्यानंतर सोडून गेलेल्या काही आमदारांना परतण्याचे वेध लागल्याचे बोलले जात आहेत. मात्र हा दावा शिंदे गटाकडून फेटाळत थेट संबंधित आमदारांचे नाव सांगणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षिसच जाहीर करण्यात आले आहे.

लोकसभेच्या निकालानंतर शिंदे गटाचे सहा आमदार उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र हा दावा शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी फेटाळला आहे. तसेच थेट ठाकरे गटातील लोकांना आव्हानही दिले आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सहा आमदारांपैकी एकाचे तरी नाव सांगा, तुम्हाला 25 हजार रुपये बक्षीस मिळेल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. मात्र कितीही मोठे बक्षीस दिले तरी ठाकरे गटाकडून संपर्कात असलेल्या आमदारांची फुटणार का, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होऊ लागला आहे.

शिवसेना फुटल्यानंतर 40 आमदार ठाकरेंना सोडून गेले. त्यांना सत्तेत असल्याने फायदा होण्याची अपेक्षा होती. मात्र पक्ष फुटीनंतर झालेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत काहीच फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. यातून शिंदे गटात चलबिचल सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आता ठाकरे गटाकडून शिंदे गटातील सहा आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. मात्र आमदार सुर्वे यांनी ठाकरे गटाचा हा दावा खोडून काढत त्यांनाच उलट चॅलेंज दिले आहे. या सहा आमदारांपैकी एकाचे तरी नाव सांगा आणि 25 हजार रुपयांचे बक्षीस घ्या, असे अमिषही त्यांनी ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांना दाखवले आहे.

सुर्वे यांना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील Gulabrao Patil यांनीही साथ देत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. असे दावे तर गेल्या अडीच वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत. आतापर्यंत आम्हाला कुणीही सोडून गेले नाहीत. उलट त्यांचेच लोक आमच्याकडे आले आहेत. त्यामुळे आताही त्यांच्यावर विश्वास नाही. गर्दीत साप सोडण्याचा काम ठाकरे गटातील लोकांना चांगले जमते. मात्र हा साप कसा पकडायचा याची कला आम्हाला अवगत आहे, असा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT