Sunil Kedar Vs Sameer Meghe : रामटेक जिंकलं अन् केदारांचा कॉन्फिडन्स 10 पटीनं वाढला; हिंगण्यातून थेट मेघेंनाच चॅलेंज

Ramtek Lok Sabha Election 2024 Result : मी शब्दाचा पक्का आहे. जे बोलतो ते करून दाखवतो. कोणी आपल्याला अंगावर घेतले तर त्याला शिंगावर घेतो. आपला इतिहास तसाच आहे.
Sunil Kedar
Sunil KedarSarkarnama

राजेश चरपे

Nagpur Political News : रामटेक लोकसभा मतदारसंघ एकहाती महाविकास आघाडीला जिंकून देणारे माजी मंत्री सुनील केदार यांनी थेट हिंगणा विधानसभा मतदारसंघात जाऊन आमदार समीर मेघे यांना खुले चॅलेंज दिले आहे. येवढेच नव्हे तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विजयाचा गुलाल उधळायला सज्ज राहा, असे आवाहन केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये धडकी भरली आहे.

आमदार मेघे यांनी लोकसभा निवडणुकीच्या कार्यकाळात एका कार्यक्रमात, आईचे दूध पिले असेल तर माझ्या विरोधात लढवून दाखवा असे आव्हान केदारांना दिले होते. लोकसभेच्या निकाल लागताच केदारांनी पहिली विजयी सभा हिंगणा येथे घेऊन मेघे यांचे चॅलेंज स्वीकारले. यावेळी हिंगणा मतदारसंघाचे माजी आमदार विजय घोडमारे Vijay Ghodmare उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात बाहेरच्या हिंगण्यात येऊ देऊ नका अशी सूचना केली.

हाच धागा पकडून केदारांनी Sunil Kedar मी आलो तर चालेल का, अशी जाहीर विचारणा करून आपली उमेदवारीसुद्धा जाहीर केली. मी शब्दाचा पक्का आहे. जे बोलतो ते करून दाखवतो. कोणी आपल्याला अंगावर घेतले तर त्याला शिंगावर घेतो. आपला इतिहास तसाच आहे. रामटेकमध्ये सर्व विरोधात असताना महाविकास आघाडीचे लेकसभेचे उमेदवार श्याम बर्वे यांना निवडून आणल्याचे केदारांचा दबदबा चांगलाच वाढला आहे.

मेघे यांना उद्देशून त्यांनी 'ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है' असाही इशारा दिला. खिशात पैसा असला की जीभ जरा जास्तच वळवळते. आता विधानसभेच्या निवडणुकीतच भेटू आणि हिशेब चुकता करू. मी राजकीय गणितात एकदाम पक्का आहे. आपली बेरीज, वजाबाकी कधीच चूकत नाही असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

Sunil Kedar
Prakash Amedkar : वंचितने पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

केदारांना सावनेर विधानसभा मतदारसंघातून आजवर पराभूत करण्याचे अनेक प्रयत्न भाजपने केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा घेऊनही ते पराभूत झाले नाही. लोकसभेच्या निवडणुकीत केदारांचा पराभव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा लावण्यात आली होती. मात्र केदारांनी भाजपला चारीमुंड्या चित केले.

त्यांनी नागपूर Nagpur जिल्हा परिषदही भाजपच्या ताब्यातून हिरावून घेतली आहे. विशेष म्हणजे हिंगणा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. येथून यापूर्वी माजी मंत्री रमेश बंग यांनी नेतृत्व केले आहे. घाडेमारे यांनीच त्यांना पराभूत केले होते. मेघे यांच्यासाठी त्यांनी जागा रिकामी केली होती. त्यानंतर घोडमारे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून मेघे यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते अपयश ठारले.

(Edited by Sunil Dhumal)

Sunil Kedar
Shambhuraj Desai : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता शंभूराज देसाई राजीनाम्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com