sharad Pawar (1).jpg Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News: शिंदेंच्या सत्कारानंतर राऊतांसह ठाकरेंची शिवसेना संतापली; शरद पवारांची पहिली रिअ‍ॅक्शन आली समोर

Sharad Pawar First Reaction On Uddhav Thackeray Shivsena criticise : ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या दिल्लीत असून कालच्या एकनाथ शिंदेंच्या पुरस्कारावरुन उठलेलं वादळ शमत नाही, तोच दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांच्यासह ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली. यामुळे ठाकरेंचा आणखीच तिळपापड झाला.

Deepak Kulkarni

New Delhi News : दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला. मात्र,हा पुरस्कार जरी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झाला असला तरी त्याचे पडसाद बुधवारी (ता.12) दिवसभरात उमटत होते. पवारांच्या या पुरस्कार सोहळ्यातील उपस्थितीतच ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला खटकली. त्यामुळे खासदार संजय राऊतांसह काही नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. पण आता ठाकरेंच्या थयथयाटावर शरद पवारांची (Sharad Pawar) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सध्या दिल्लीत असून कालच्या एकनाथ शिंदेंच्या पुरस्कारावरुन उठलेलं वादळ शमत नाही, तोच दुसरीकडे शिंदे यांच्या पक्षाचे नेते उदय सामंत यांच्यासह ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी पुन्हा एकदा पवारांची भेट घेतली. यामुळे ठाकरेंचा आणखीच तिळपापड झाला. अशातच आता शरद पवारांनी या सगळ्या प्रकारावर फक्त स्मितहास्य केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी दिली आहे.

शिवसेनेचे खासदार खासदार निलेश लंके हे बुधवारी दिल्लीत शरद पवारांसोबतच होते. ते म्हणाले, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवारांवर टीका केली,ती माध्यमांवर दाखवण्यात येत होत्या, तेव्हा शरद पवारांनी फक्त मिश्किलपणे स्मितहास्य केल्याचं लंके यांनी सांगितले.

खासदार निलेश लंके म्हणाले,जेव्हा ही न्यूज पाहिली, तेव्हा मी 6 जनपथ या पवारसाहेबांच्या निवासस्थानीच होतो. तेव्हा ही न्यूज पाहून आम्हीही शॉकेबल झालो होतो. तसेच यावेळी आम्हांला सर्वांना संजय राऊतांकडून असं वक्तव्य कसं गेलं, असाही प्रश्न आम्हाला पडला. राऊत हे स्वत: बोलत आहेत की,त्यांच्या तोंडून दुसरं कोणी हे वदवून घेत आहेत? अशी शंकाही खासदार लंके यांनी उपस्थित केली.

दिल्लीतील एकनाथ शिंदेंच्या सत्कार सोहळ्यावर संजय राऊतांची टीका पाहून शरद पवारसाहेब मिश्कीलपणे हसले. त्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,फक्त ते मिश्कील हसले, त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य होतं,असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निलेश लंकेंनी म्हटलं.

जेष्ठ नेते शरद पवारांवर खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. त्यात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या प्रतिक्रियेचाही समावेश होता. दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे, असल्याचंं त्यांनी म्हटलं.

रोहित पवार सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊत साहेबांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली असून स्व. बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवारसाहेब यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यांनी ही परंपरा पुढे नेली, सामाजिक-सांकृतिक कार्यक्रमांना राजकीय मतभेदाचा कधीही अडसर ठरू दिला नाही.

तसेच महाराष्ट्राची सामाजिक व सांकृतिक वीण अधिक घट्ट करण्यावर नेहमीच भर दिला. पण मागील दोन-तीन वर्षांत भाजपाने कलुषित केलेले राजकारण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी केलेली छेडछाड बघता यामुळंच संजय राऊत साहेबांनी तडकाफडकी ही प्रतिक्रिया दिली असावी! , अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT