devendra Fadnavis : भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत फडणवीसांचे सूचक वक्तव्य; बालभारतीचे पुस्तक हातात घेत म्हणाले, 'छगन कमळ बघ'

Bhujbal BJP Entry News : भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनातील खदखद बोलूनही दाखवली होती.
Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Chhagan Bhujbal devendra fadnavis sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळल्यापासून ते नाराज आहेत. भुजबळ यांनी ही नाराज असल्याचे सपष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला दांडी मारत त्यांनी नाराजी दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनातील खदखद बोलूनही दाखवली होती. त्यावेळी फडणवीस यांनी भुजबळांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे गेले काही दिवस ते शांतही राहिले.

राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांच्या पुनर्वसनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) काहीच हालचाली दिसत नसल्याने येत्या काळात छगन भुजबळ काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'सकाळ सन्मान' सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्याचवेळी कार्यक्रमप्रसंगी भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केले.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Shivsena UBT : 'तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा', ठाकरेंचे शिलेदार पोहोचले पोलिस ठाण्यात

या कार्यक्रमप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बालभारतीचे पुस्तक हाती घेत, 'छगन कमळ बघ', असे वक्तव्य केले. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यांचे हे विधान भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक इशारा असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी जोरात रंगली होती. त्यामुळे येत्या काळात छगन भुजबळ भाजप प्रवेश करणार का ? याची चर्चा पुन्हा नव्याने सुरु झाली आहे.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Eknath Shinde : शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना दिला दिल्लीतून धक्का, दोन नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश!

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दावोसमधून काय साधलं,यावरही रोखठोक विधान केलं.ते म्हणाले,सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे,दावोसमधील या करारांमधून आपण काय साधलं.तर जगामध्ये महाराष्ट्राचा बोलबाला पोहचला. कारण दावोस हे अशी जागा आहे, जिथं जग असतं,आणि एकमेकांवर नजर ठेवून असतं. त्यामुळे महाराष्ट्राचा बोलबाला जगात पोहचला.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Aaditya Thackeray criticized BJP : 'गोव्यातून इराकला बीफ पाठवलं जातंय अन् हे आम्हाला हिंदुत्व...' ; आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला!

दावोसमधील गुंतवणुकीत फार मोठं यश आपल्याला मिळालं. खूप चांगले करार करण्यात आल्याचंही नमूद केलं. यावेळी फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रांत आपण गुंतवणूक करू शकलो.अनेक परदेशी कंपन्यांशी आमची चर्चा झाली.जे करार तिथे झाले नाहीत,ते आता भारतात केले जात आहे.किंवा त्या कंपन्या भारतात येणार असून त्यानंतर या कंपन्यांसोबत करार केले जाणार आहे.

Chhagan Bhujbal  devendra fadnavis
Sharad Pawar : दिल्लीत घडामोडीना वेग, राज्यात वातावरण तापलं; शरद पवारांच्या भेटीनंतर शिंदे सेनेचे नेते म्हणतात,...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com