Sanjay Raut, Eknath Shinde, Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "शरद पवार आम्हाला पित्यासमान...", राऊतांचा सूर बदलला, आधी थयथयाट आता मवाळ भूमिका

Sanjay Raut on Sharad Pawar : दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण या कार्यक्रमात शरद पवार गेल्याने ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली.

Jagdish Patil

Mumbai News, 14 Feb : दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देण्यात आला. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. कारण या कार्यक्रमात शरद पवार गेल्याने ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली.

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर हा पुरस्कार देण्यावरून थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला. राजकारण आम्हालाही कळतं पण काही कार्यक्रम टाळायचे असतात. शरद पवारांनी या कार्यक्रमाला जायला नको होतं, असं म्हणत राऊतांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. ठाकरेंच्या नेत्यांनी थेट पवारांनी विश्वासघात केल्याचंही वक्तव्य केलं. मात्र, आता राऊतांनी आपल्या वक्तव्यावर सारवासारव करत मवाळ भूमिका घेतल्याचं दिसत आहे. "शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत", असं वक्तव्य आता राऊतांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "शरद पवारांविषयी (Sharad Pawar) नाराजी असण्याचं कारण काय? त्यांच्यावर अजिबात नाराजी नाही. आम्ही विशिष्ट घटनेपुरती पक्षाची भूमिका मांडली. मात्र आमची नाराजी नाही. पवार साहेबांसारखे ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्र ज्याला गद्दार म्हणून संबोधतो, ज्याने अमित शहांशी हा‍तमिळवणी करून सरकार पाडलं, त्यांचा सत्कार पवार साहेबांच्या हातून करणं हा शरद पवारांचा अपमान आहे.

जे टीका करतात त्यांना माझे आणि पवार साहेबांचे संबंध माहिती नाहीत. शरद पवार आम्हाला पित्यासमान आहेत. मी पक्षाची भूमिका मांडली. शिंदे गटाला आलेला पवारांचा पुळका खोटा आहे. अमित शाह महाराष्ट्रात येऊन पवारांवर टीका करतात. शरद पवारांनी सहकाराचा बट्टयाबोळ केला, लूट केली, असं म्हणतात, तेव्हा त्यांचा अपमान झाला नाही का?

नरेंद्र मोदी पवारसाहेबांना भटकती आत्मा म्हणाले, तेव्हा यांच्या तोंडाला बूच बसली होती का? असा संतप्त सवाल विचारत राऊतांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. शिवाय जर शिंदेंनी पक्ष फोडला नसता तर शरद पवारांचा पक्ष देखील फुटला नसता. अजित पवार बाहेर पडले नसते. उलट ही शरद पवारांची सुद्धा भूमिका असायला हवी. मी बोललो कारण माझ्या हिम्मत आहे. हे सगळे भंपक लोक आहेत, अशा शब्दात त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

एकनाथ शिंदेंना भारतरत्न द्यावा

तर, एकनाथ शिंदेंना भारतरत्न द्यावा. परमवीर चक्र द्यावं. माझा आक्षेप एवढाच आहे की महादजी शिंदे शूर योद्धा होते. त्यांनी दिल्लीचे पाय कधीच चाटले नाहीत. त्यांच्या नावाचा पुरस्कार एक खाजगी संस्था देते आणि त्याचा एवढा गवगवा केला. शिंदेंना पुरस्कार देऊन त्यांच्या शौर्याचा अपमान केला. पवारांनी या कार्यक्रमाला जाणं महाराष्ट्राला आणि त्यांच्या पक्षालाही तर रुचलेलं नाही, असंही राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT