Thane News : 'धर्मवीर' चित्रपटात आधी काही गोष्टी खऱ्या दाखविल्या नव्हत्या. परंतु आता पुढच्या भागात सगळे खरे दाखविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना सांगितले. तसेच शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची लोकप्रियता सलू लागल्यावर त्यांना पदावरून बाजूला करण्याचे कारस्थान आणि डाव होता. ते रुग्णालयात असताना त्यांना तसा निरोपही आल्याने दिघे बैचेन होते,असा खळबळजनक गौप्यस्फोट यावेळी शिंदे यांनी केला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ सोमवार, ठाण्यातील टीप टॉप प्लाझा येथे महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी धर्मवीर चित्रपटाबाबत बोलताना सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी आनंद दिघेंना मातोश्रीने मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. ठाणे आणि पालघर जिल्हा हा एकच होता. त्याचे नेतृत्व आनंद दिघे हे करत होते. त्यांना मातोश्रीने पद आणि जिल्हा सोडायला सांगितले होते. परंतु दिघे यांनी पद आणि जिल्हा सोडला तर, आपल्यासोबत एकही माणूस राहणार नाही, असे अनेकांनी त्यांना सांगितले.
त्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. याशिवाय दिघे हे फकीर माणूस होते, दोन्ही हाताने वाटणारे होते आणि शाखेत राहत होते. पण दिघे यांच्या निधनानंतर मला त्यांची मालमत्ता विचारली. तेव्हाच आपण चुकीच्या ठिकाणी आल्याची मला जाणीव झाली. परंतु नाईलाजाने काम करत होतो, असेही ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकसभा निवडणुक ही नगरसेवकांची ट्रायल आहे, ही निवडणूक झाली की महापालिका निवडणूक आहे. तुम्ही लीड द्या आम्ही तिकीट देऊ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थिती माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना केले. तसेच उमेदवार नरेश म्हस्के यांना तुम्ही खासदार झाल्यावर नगरसेवक आमदार यांच्या कोणत्याही कामात आडकाठी आणायची नाही असे मुख्यमंत्र्यांची यावेळी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मी त्यांच्या मंत्रिमंडळात असताना एका खोट्या गुन्ह्यात नाव गोवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. असा आरोपही यावेळी केला. तर दिघे यांचे असली शिष्य कोण असेल तर ते नरेश आहे. राजन हा नकली शिष्य असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.
म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाईक समर्थकांनी नाराज व्यक्त राजीनामे दिले. तसेच उमेदवारी अर्ज सादर नाईक कुटुंबियांनी हजेरी लावली होती. याचदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री गणेश नाईकांनी नाराज झालो हे खरे आहे असे स्पष्टपणे म्हटले. सोमवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात नाईक कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हते. नाईक कुटुंबाची अनुपस्थिती यावेळी प्रखरतेने दिसून आली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.