Eknath Shinde : 'काँग्रेसका हात पाकिस्तान के साथ', वड्डेटीवारांना मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारले

Congress : काँग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Eknath Shinde  Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Political News : विजय वड्डेटीवारांनी 26/11 हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का? अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. तसेच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसला Congress उद्देशून 'काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ' असा घणाघात मुख्यमंत्र्‍यांनी केला.

Eknath Shinde  Vijay Wadettiwar
kalyan Loksabha Election : ठाकरे गटाचे रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज मागे, कल्याणमध्ये दुरंगी लढत

विजय वड्डेटीवारांनी Vijay Wadettiwar 26/11 हल्ल्यातील शहिद पोलिस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंज चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या Rahul Gandhi नादाला लागून विजय वड्डेटीवार वेडे झाले आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे. वकील उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगवला.

नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही, असे शिंदे म्हणाले.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे, असे दाखवून दिले. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Edited By Roshan More)

Eknath Shinde  Vijay Wadettiwar
Raj Thackeray News : वर्षापूर्वीच कोकण वाचवा म्हणणारे राज यांनी त्याच मुद्द्यावरून उद्धवना विकासविरोधी ठरवले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com