Eknath Shinde News Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde News : '...म्हणून एकनाथ शिंदे यंदाची विधानसभा निवडणूक लढवणार नव्हते!'; 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

Eknath Shinde Shivsena Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग पकडला असून सर्व नेते मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी आता जेमतेम 12 दिवसांचा कालावधी उरला असून आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी सभा घेण्याची तयारी नेत्यांनी केली आहे. शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सर्वाधिक प्रचारसभा होणार असून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

Deepak Kulkarni

Thane News : शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच सामोरे जात असलेल्या या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी सगळीच ताकद पणाला लावली आहे. अभी नही तो कभी नही म्हणत दोन्ही नेत्यांनी एकमेकांसमोर तगडं आव्हान देण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे.

याचदरम्यान, एक धक्कादायक माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाण्यातून समोर आली आहे. ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं आता वेग पकडला असून सर्व नेते मैदानात उतरले आहेत. प्रचारासाठी आता जेमतेम 12 दिवसांचा कालावधी उरला असून आपल्या प्रत्येक उमेदवारासाठी सभा घेण्याची तयारी नेत्यांनी केली आहे. शिवसेनेमध्ये (Shivsena) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच सर्वाधिक प्रचारसभा होणार असून ते संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी (ता.7) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री शिंदे ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढणार नव्हते असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे नेहमीच स्वत:पेक्षा इतरांचा जास्त विचार करतात.आताही त्यांचं सर्व ठिकाणी लक्ष असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं आहे.

नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले ?

खासदार नरेश म्हस्के म्हणाले, गेल्या आठवड्यात आमचे माजी खासदार राहुल शेवाळे आणि संजय निरुपम यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या होत्या.मी काही विधानसभेची निवडणूक लढणार नाही.मला अख्ख्या महाराष्ट्रात फिरायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं.

पण आम्ही आम्ही शिंदेसाहेबांकडे गेलो,त्यांना असं चालणार नाही, म्हणून सांगितलं. तुम्ही फक्त उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मतदारसंघात या,बाकी आम्ही सांभाळतो,असा विश्वासही त्यांना दिला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी विधानसभेचा उमेदवारी अर्ज भरला असं कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितलं. ते पायाला भिंगरी लावल्यासारखं काम करतात अशी स्तुतीसुमनंही त्यांनी उधळली.

'आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजून...'

मला महायुतीचा प्रत्येक उमेदवार आपल्या प्रचारासाठी मला येण्यास सांगत होता,परंतु कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून लढलो तर उमेदवारांच्या प्रचाराला जाणे शक्य होणार नाही असं शिंदेंना वाटत होते.

परंतु,त्यांनी निवडणूक लढवावी असा आमचा आग्रह होता. यावेळी तुम्ही अर्ज भरा,आम्ही स्वत:ला एकनाथ शिंदे समजून तुमचा प्रचार करू, अशी विनंती शिंदेंना केली. त्यानंतर ते निवडणूक लढण्याचा विचार करू लागले,असा गौप्यस्फोट खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

शिंदे विरुद्ध दिघे हायव्होल्टेज लढत

मुख्यमंत्री लढवत असलेल्या ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. तिथे एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी थेट हायव्होल्टेज लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजन विचारे यांचा पराभव झाला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT