Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Jalna Maratha Protest : जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय

Eknath Shinde On Jalna Maratha Reservation Agitation : माणुसकीला काळीमा फसणारी घटना म्हणत विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai News : जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे चार दिवसांपासून मराठा समाजाचे आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलकांवर शुक्रवारी पोलिसांनी हवेत गोळाबार करत जोरदार लाठीचार्ज केला. आंदोलनाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असूनही आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मराठा समाजासह विरोधकांनी केला आहे. राज्यभरातून टीकेची झोड उठू लागल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी या प्रकाराची उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देणार असल्याचा इशारा दिला आहे. (Latest Political News)

जालनातील आंदोलन समितीचे सचिव मनोज जरांगे यांना आंदोलन करू नका, असे आवाहन केल्याचा खुलासाही शिंदेंनी केला आहे. ते म्हणाले, "आंदोलनाबात मनोजशी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बोलणे झाले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही आंदोलन करू नका, असे त्यांना सांगितले होते. मनोज यांच्याशी बोलणे झाल्यानंतर अधिकारी यावर काम करत होते. यातच हा दुर्दैवी प्रकार घडला," अशी खंतही शिंदेंनी व्यक्त केली.

आंदोलनस्थळी नेमके काय झाले, याबाबतची माहितीही मुख्यमंत्री शिंदेंनी दिली. "या प्रकरणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केली. यानंतर दुर्दैवी प्रकार घडला आहे. जाळपोळीचेही प्रकार घडले आहेत. हे प्रकार कुणी केले, याबाबत ठोस माहिती नाही. त्यामुळे आता या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. यानंतर जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे," असा इशाराही शिंदेंनी दिला आहे.

जालन्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. आंदोलकांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही वेळात धुळे - सोलापूर महामार्गावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. आंदोलनादरम्यान, दगडफेक झाल्याने पोलिसही जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना म्हणत विरोधकांनी या लाठीचार्जचा निषेध केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी या घटनेची उच्च स्तरावर चौकशी करणार असल्याचा इशारा दिला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT