Rahul Gandhi, Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना स्वत:च्या विजयाची खात्री नाही ते देशाची गॅरंटी काय देणार ?

Loksabha Election 2024 : संजय निरुपम यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शुक्रवारी (ता.3) शिवसेनेत पक्षप्रवेश...

Pankaj Rodekar

Thane News : कल्याण लोकसभेसाठी उध्दव सेनेला आपला पराभव दिसत आहे. त्यात त्यांनाच त्यांच्या उमेदवारावर विश्वास नसल्याचेही दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आणखी एक उमेदवार उभा केला आहे. त्यांनी दोन काय किंवा आणखी 10 उमेदवार उभे केले तरीदेखील कल्याणमधून डॉ. श्रीकांत शिंदे हेच निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच राहुल गांधी हे वारंवार मतदारसंघ बदलत असून ज्यांना स्वत:च्या विजयाची खात्री नाही ते देशाची गॅरंटी काय देणार असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

संजय निरुपम Sanjay Nirupam यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शुक्रवारी (ता.3) शिवसेनेत पक्षप्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवरही जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, खरी शिवसेना, धणुष्यबाण, बाळासाहेबांचे विचार हे आमच्याकडे आहेत. त्यामुळे स्वांतत्रवीर सावरकरांचे नाव देखील घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांना नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान,शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर संजय निरुपम यांच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. निरुपम हे आता शिवसेनेचे प्रवक्ते तसेच समन्वयक म्हणून काम पाहतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पक्षात येताना त्यांनी कोणताही अपेक्षा न ठेवता प्रवेश केला असून यासाठी मी त्यांचे कौतुक करतो असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'20 वर्षानंतर स्वगृही परतलो..!'

संजय निरुपम यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 20 वर्षांनंतर मी आज आपल्या पत्नी आणि इतर पदाधिकाऱ्यांसमवेत स्वगृही परतलो आहे. काँग्रेसमध्ये असतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या Balasaheb Thackeray विचारानुसारच काम करत होतो. काँग्रेसमध्ये दगाबाजी झाली, मला लोकसभा लढवायची होती. मात्र, आता शिंदे यांचे हात मजबूत करायचे असल्याने त्यांच्यासाठी काम करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT