Sanjay Nirupam News : 'भंडारा संपला, चप्पलही चोरी झाली', शिंदे गटात प्रवेश करताच संजय निरुपम असे का म्हणाले?

Eknath Shinde : माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. मी 20 वर्षांनी स्वगृही परत आलो आहे. मला लोकसभा लढवायची होती. मात्र काँग्रेसच्या लोकांना दगाबाजी केली.
Sanjay Nirupam Eknath Shinde
Sanjay Nirupam Eknath Shindesarkarnama

Loksabha Election : काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संजय निरुपमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट निरुपम यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या निरुपम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही. त्यामुळे 'भंडारा संपला, चप्पल ही चोरी झाली' अशी टीका विरोधक करत असल्याचे संजय निरुपम म्हणाले.

Sanjay Nirupam Eknath Shinde
Maratha Reservation News : सगेसोयऱ्यांबाबतचा निर्णय निवडणुकीनंतर : अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

'मी शिवसेनेत Shivsena प्रवेश करत आहे. लोकसभा निवडणूक लढण्याची माझी इच्छा होती. पण विरोधक म्हणतात ते आत गेले तर भंडारा संपला होता. आणि बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली होती. सध्या परिस्थिती अशी आहे.पण काही अडचण नाही.', असे संजय निरुपम Sanjay Nirupam म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माझ्या रक्तात बाळासाहेबांचे विचार आहेत. मी 20 वर्षांनी स्वगृही परत आलो आहे. मला लोकसभा लढवायची होती. मात्र काँग्रेसच्या लोकांना दगाबाजी केली. शिंदे साहेबांची Eknath Shinde जानेवारी भेट घेतली. ते सांगतील ते जबाबदारी पार पाडेल. शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करेल, असे संजय निरुपम यांनी सांगितले.

एकनाथ शिंदेंनी केले कौतुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, संजय निरुपम शिवसेनेत आले. जे काम द्याल ते करायला मी तयार आहे, असे ते म्हणाले. राज्य, राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची त्यांची पद्धत आहे. त्याचा शिवसेनेला फायदा होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निरुपमांचे कौतुक केले.

Sanjay Nirupam Eknath Shinde
Priyanka Gandhi News : प्रियांका गांधींसाठी असा आहे काँग्रेसचा प्लॅन; पण राहुल जिंकले तरच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com