Eknath Shinde News : महायुतीत एकनाथ शिंदेंचं वजन वाढलं; अजितदादांचं काय ?

Political News : महायुतीत जागावाटपाचा घोळ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. मात्र,या जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाट्याला 28 जागा आल्या. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला 15 आणि अजित पवार गटाच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Political News: महायुतीत जागावाटपाचा घोळ गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होता. मात्र,या जागावाटपात भाजप मोठा भाऊ ठरला आहे. भाजपच्या वाट्याला 28 जागा आल्या आहेत तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाला 15 आणि अजित पवार गटाच्या वाट्याला चार जागा आल्या आहेत. तर एक जागा मित्र पक्ष असलेल्या महादेव जानकरांच्या रासपच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आलेल्या जागा या अजित पवार गटाच्या तुलनेत जास्त असल्याने शिंदे गट त्यामध्ये वरचढ ठरल्याचे दिसत आहे.

शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडताना एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासोबत 40 आमदार व 13 खासदार होते तर राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) सोडताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत 40 आमदार व 1 खासदार होता. त्यामुळे लोकसभेचे जागावाटप करताना दोन्ही गटाला समान जागा मिळतील, अशी चर्चा असताना यामध्ये शिंदे गट वरचढ ठरला असून शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या तर अजित पवार गटाच्या वाट्याला चारच जागा आल्याने शिंदे गटाचे वजन महायुतीच्या दरबारात चांगलेच वाढल्याचे दिसते. (Eknath Shinde News)

Ajit Pawar, Eknath Shinde
Sanjay Nirupam News : काँग्रेसचा हात सोडणाऱ्या संजय निरुपमांचं ठरलं, तब्बल 20 वर्षांनी स्वगृही परतणार

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेने शिवसेनेत बंड करीत उद्धव ठाकरेंचे सरकार पडले.त्यानंतर भाजपसोबत महायुतीमध्ये ते सहभागी झाले होते.त्यानंतर वर्षभरानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत महायुतीच्या सरकारमध्ये 40 आमदारांसह सहभागी झाले होते.अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर शिंदेंच्या आमदारांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली होती.

शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला येणारी मंत्रिपदे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेली.त्यानंतर पालकमंत्रिपदांच्या निवडीतही अजित पवार यांनी बाजी मारली.अजितदादा सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भरत गोगावले, संजय शिरसाट आदी शिंदे गटाच्या नेत्यांचे मंत्रिपदांचे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गट व अजित पवार गटाच्या वाट्याला किती जागा उत्सुकता होती.

शिंदे गटाकडे मावळत्या लोकसभेतील 13 खासदार सोबत आहेत. सर्व 13 जागा कायम ठेवून आणखी जागा मिळाव्यात, असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न होता. सुरुवातीला भाजपने जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये शिंदे गटाला अधिक जागा सोडण्यास नकार दिला होता. पण शिंदे यांनी दिल्लीत आपले वजन वापरून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला ‘प्रमाण’ मानून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विदर्भातील रामटेक, यवतमाळ आणि हिंगोली मतदारसंघातील उमेदवार बदलावे लागले होते. यामुळे शिंदे यांच्या वाट्याला 13 जागा तरी कायम राखता येतील का, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे एकीकडे शिंदे गटात मोठी अस्वथता होती.

अंतर्गत सर्वेक्षणाचा दाखला देऊन कृपाल तुमाने, हेमंत पाटील व भावना गवळी यांच्याप्रमाणे आपले हे तिकीट कापले जाणार अशी भीती निर्माण झाल्यानंतर तेराही खासदार आक्रमक झाले. त्यांनी दबाव गट निर्माण करत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. आम्हाला सर्वांना उमेदवारी मिळालीच पाहिजे असा आग्रह धरला आहेत. तसे न झाल्यास या खासदारांनी बंडखोरी करण्याचा इशाराही दिला होता.

या खासदारांना तिकीट न दिल्यास शिंदे गटाविषयी शब्द न पाळल्याबद्दल खासदार आणि आमदारांच्या मनात वेगळी भूमिका निर्माण होईल.यामुळे सोबत आलेले अनेक आमदारही परतीचा रस्ता धरतील,अशी भीती शिंदे गटाच्या नेत्यांना वाटू लागली होती. यामुळे शांत असलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी अचानक काहीशी आक्रमक पवित्रा घेत सर्व तेरा खासदारांना तिकीट दिलेच पाहिजे, असा आग्रह धरला. विशेष म्हणजे शिंदेंनी दिल्ली दरबारी त्यांचे वजन दाखवत 15 जागा स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या आहेत.

Ajit Pawar, Eknath Shinde
Ravikant Tupkar News :शिंदे गटाच्या आमदाराची 'तुपकरांची शिकार करू' ही धमकी; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

शिंदे गटाच्या या तुलनेत आठ ते नऊ जागांची मागणी करणाऱ्या अजित पवार गटाच्या फक्त चार जागा आल्या आहेत. परभणीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यासाठी राष्ट्रवादीने जागा सोडली होती. तरीही शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटाला तेवढ्या जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे या लोकसभेच्या जागावाटपात अजित पवार गटाची मोठी पीछेहाट झाली असल्याची चर्चा आहे.

अजित पवार गटाला विद्यमान खासदार असलेली राययगडची जागा मिळाली. या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. बारामतीतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत तर शिरूरमध्ये शिंदे गटातून आलेले शिवाजीराव आढळराव-पाटील यांना तर धाराशिवमधून भाजपमधून आलेल्या अर्चना पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे. त्यामुळे चार जागा दिल्या असल्या तरी त्यांच्या पक्षाचे दोनच उमेदवार रिंगणात आहेत तर दुसरीकडे दोन उमेदवार इतर पक्षातून आयात करण्यात आलेले उमेदवार आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या तुलनेत अजित पवार गटाला खूप कमी जागा मिळाल्या आहेत.

अजित पवार गटाला विधानसभेच्या अधिक जागा हव्या आहेत. यामुळे लोकसभेसाठी कमी जागा स्वीकारल्याचे या पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत जास्तीत जास्त जागा पटकावून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Eknath Shinde News : लोखंडेंसाठी मुख्यमंत्री शिंदेंचं स्नेहलता कोल्हेंना साकडं; आता फडणवीसांच्या आदेशाकडं लक्ष

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com