Sachin Ahir Sarkarnama
मुंबई

Sachin Ahir Politics: एकनाथ शिंदेंचा 'फूलप्रूफ' प्लॅन फसणार, सचिन अहिर यांची आमदारकी जाणार? ठाकरे पुढच्या 24 तासांतच मोठा निर्णय घेणार

Shivsena News: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्यानंतर मंगळवारी (ता.30)पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला.

Deepak Kulkarni

Mumbai News: गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे 6 खासदार फुटल्यानंतर मंगळवारी (ता.30)पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. आमदार सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरेंचे निकटवर्तीय असलेल्या अहिर यांना गळाला लावत शिंदेंना मोठा डाव साधला. पण आता शिंदेंचा हा फूलप्रूफ प्लॅन फसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार सचिन अहिर यांची एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे जे करतो ते फुलप्रूफ करतो, त्यामुळे काही अडचण नाही असं अहिरांना कुठलेही अडचण येणार नसल्याचंच स्पष्ट केलं होतं. पण आता उद्धव ठाकरे पुढील 24 तासांत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर आता ठाकरे गटाकडून कारवाईसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आता उद्धव ठाकरे विधान परिषद सभापतींना कारवाईसाठी पत्र देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरेंनी आता फुटलेल्या अहिरांवर कारवाईसाठी शिवसेनेकडून कायदेशीर सल्लाही घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता सचिन अहिर यांच्या आमदारकीवर टांगती तलवार आहे. अहिर यांच्या अडचणी पुढील काळात वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह पत्रकार परिषद पार पडली. यावेळी अहिर म्हणाले, एकनाथ शिंदेंनी मला उपसभापती या पदासाठीचा मान दिला. तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कॉमन मॅन म्हणून मुख्यमंत्री असताना काम केलं. सरकारमध्ये राहून काम केलं पाहिजे. पण विधिमंडळातूनही उपसभापतीपदाला न्याय देण्याचं काम मी त्यांच्या नेतृत्वात करणार असल्याचंही सचिन अहिर यांनी सांगितलं.

विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी शिवसेना पक्ष सोडला नसल्याचं स्पष्टपणे म्हटलं आहे. तांत्रिक मुद्द्यावर वेगळ्या व्यासपीठावर बोलू असं त्यांनी सांगत अतिघाईने ठाकरेंवर निशाणा साधण्याचं सध्यातरी टाळल्याचं दिसून येत आहे.

यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सचिन अहिर यांची तात्काळ बाजू घेतली. ते म्हणाले, ज्यावेळी सचिन अहिर हे आमदार झाले, त्यावेळी आम्हीच त्यांना मतदान केलेलं होतं. ते आमदार झाले, तेव्हा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह होतं. आज हे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना पक्ष सोडला वगैरे म्हणता येणार नाही, असा तांत्रिक मुद्दा एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT