

Solapur, 30 June : आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) आपला मोर्चा शिर्डीनंतर आता अक्कलकोटकडे वळविला आहे. अक्कलकोट शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील २३ मिठाई दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. पेढा आणि बर्फीचे तीन नुमने तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने अक्कलकोटमधील श्री लक्ष्मी डेअरीचीही तपासणी केली. या डेअरीतून दूध, पनीर व पेढा या तीन पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे प्रलंबित आहे.
सोलापूरचे सहायक आयुक्त (अन्न) साहेबराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उ. मु. एखंडे व त्यांच्या सहकारी पथकाने ही कारवाई केली आहे. या पथकाने मिठाईच्या २३ दुकानांतील अन्नपदार्थाची तपासणी करून पेढा-बर्फीचे नमुने जप्त केले आहेत.
स्वामी समर्थ मंदिर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या दुकानांचीही विशेष मोहिमेद्वारे तपासणी करण्यात आली. या वेळी सुमारे २३ अन्न व्यावसायिकांची तपासणी केली. ग्राहकांच्या आरोग्याचा विचार करता, येथील दुकानांमधून पेढा आणि बर्फीचे ३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे अद्याप प्रलंबित आहे.
अन्न व औषध प्रशासनाने गेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात अक्कलकोटमध्ये अन्न व्यावसायिकांच्या एकूण ३० तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ दुकानाविरोधात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या कलम ६९ नुसार तडजोड प्रकरणे दाखल करण्यात आली. या कारवाईतून १६ हजार रुपयांचा दंड आकारून तो शासकीय खात्यात जमा करण्यात आला आहे. तसेच, दोन दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अक्कलकोट येथील श्री लक्ष्मी डेअरीची तपासणी करण्यात आली आहे. या डेअरीतून दूध, पनीर व पेढा या 3 अन्नपदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आली आहेत. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे अक्कलकोट शहरात आगामी काळातही हॉटेल, कॅन्टीन, रेस्टॉरंट आणि इतर खाद्यपेयांच्या दुकानांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येईल. अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील नियमांचे सर्व दुकानदारांनी काटेकोरपणे पालन करावे. तपासणीदरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन सोलापूरचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.