Maharashtra Cabinet Sarkarnama
मुंबई

Cabinet Ayodhya Tour : राज्य मंत्रिमंडळाचा अयोध्या दौरा लांबणीवर? काय आहेत कारणं ?

CM Eknath Shinde : सध्या अयोध्येत देशभरातील रामभक्त दर्शनासाठी येत आहे. त्यामुळे तेथील प्रशासनावर ताण निर्माण झाला आहे.

Jui Jadhav

Maharashtra Political News : अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचे लोकार्पण आणि रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना निमंत्रण होते. त्यावेळी मात्र राज्यात मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघाले होते. राज्यातील स्थिती आरक्षणावरून चिघळत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येला जाणे टाळले. त्यावेळीच मुख्यमंत्री शिंदेंनी मंत्रिमंडळाला घेऊन रामलल्लाच्या दर्शनाला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता मंत्रिमंडळाचा हा अयोध्या दौर लांबणीवर पडणार असल्याची चर्चा आहे.

राज्यातील घडामोडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांचे मंत्रिमंडळ अयोध्या दौऱ्याला जाणार होते. आधी 5 फेब्रुवारीला ही तारीख निश्चित झाली होती. मात्र उल्हासनगर येथे भाजप आमदाराने केलेल्या गोळीबारानंतर सरकारवर टीकेची झोड उठू लागली आहे. हे प्रकरण मुख्यमंत्री शिंदेंच्याच ठाण्यात झाल्याने ते याकडे लक्ष देऊन आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी मंत्रिमंडळासह अयोध्येला जाणे टाळले आहे.

कुटुंबवत्सल

राज्याच्या कारभाराकडे जातीने लक्ष घालणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुटुंबवत्सल आहेत. मध्यंतरी त्यांचा शेतात नातवाला स्ट्रॉबेरी खाऊ घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदेंचा वाढदिवस होता. आता स्वतः शिंदे यांचा वाढदिवस आणि त्यानंतर त्यांच्या नातवाचा वाढदिवस आहे.

शिवसेनेचे अधिवेशन

शिवसेनेचे अधिवेशन देखील रखडत आहे. आता हे दोन दिवसीय अधिवेशन 16-17 तारखेला होणार आहे. यावेळी अनेक विषयांवर ठराव मांडला जाणार आहे. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मांडला जाणार असल्याची चर्चा होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य करणारा अध्यदेश काढला, मात्र यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला आहे. अधिवेशनात ते यावर भाष्य करण्याची शक्यता आहे. शिवसेना फुटीनंतर शिंदे गटात बहुतांश आमदार आणि खासदार गेले आहेत. त्यामुळे नवीन कार्यकारीणी देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

निवडणुकीचे वर्ष

राज्यात हे वर्ष निवडणुकीचे ठरणार आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी शिवेसेनेच्या तयारीवर आढावा घेतला जाऊ शकतो. शिवसेनेची सध्या राज्यातील परिस्थिती आणि एकंदरीत कोणत्या भागात कोणता उमेदवार द्यायचा, कुठल्या पक्षाचा विरोधात याचा देखील विचार केला जाऊ शकतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अयोध्येत महाराष्ट्राचं शक्तिप्रदर्शन

सध्या अयोध्येत (Ayodhya) देशभरातील रामभक्त दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनावरील ताण वाढत आहे. याचाही फटका राज्यातील मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याला बसत असे समजते. परिणामी हा दौरा पुढे जाण्याची शक्यता आहे. आता हा दौरा पुढील महिन्यात निश्चित होऊ शकतो, अशी माहिती आहे.

अयोध्येत महाराष्ट्रातील नेत्यांचे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्रतून कार्यकर्ते तिथे जाण्याच्या तयारीत आहेत. मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि झेंडे लावण्याची तयारी केली जाणार आहे. महाराष्ट्रतील सगळे मंत्री अयोध्येत जाणार आहेत आणि इतरही नेते मंडळी त्यांच्यासोबत जाणार आहेत. याचा सत्ताधाऱ्यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा होऊ शकतो.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT