Loksabha 2024 : धाराशिव मतदारसंघ भाजप की शिवसेना लढवणार? मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानं इच्छुकांचा उत्साह शिगेला

Eknath Shinde Tour Dharashiv Loksabha Constituency : मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पहिल्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Eknath Shinde Dharashiv
Eknath Shinde DharashivSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv : महायुतीत धाराशिव लोकसभेची जागा भाजप लढवणार की शिंदेची शिवसेना याची चर्चा सुरू आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) धाराशिव दौऱ्यावर येत आहेत. शिवसेना पक्ष म्हणून शिंदे यांचा हा पहिलाच धाराशिव दौरा आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात येणार आहे. दौऱ्यामुळे धाराशिवची जागा शिवसेनाच लढविणार असल्याचं संकेत मिळत असून इच्छुकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

Eknath Shinde Dharashiv
Nitesh Rane : मालेगाव 'मिनी पाकिस्तान' विधानावर नितेश राणे ठाम; म्हणाले, "माफी मागणार..."

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांनी पहिल्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. मेळाव्याच्या पूर्व तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या उमेदवारीची चर्चाही जिल्हाभरात होताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी महायुतीतील तीनही पक्षांच्या इच्छूकांना मतदारसंघात भावी खासदार म्हणून पोस्टरबाजी करू नका, अशी सक्त ताकीद दिलेली आहे. असं असताना धनंजय सावंत यांनी मात्र त्याकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाहीत. जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांच्या नावाचे डिजिटल फलक झळकत आहेत. भूम तालुक्यातील काही ग्रामपंचायत कार्यालयाकडून लोकसभेची उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठीचे ठरावही धनंजय सावंत यांनी मिळल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात होत आहे.

Eknath Shinde Dharashiv
Ganpat Gaikwad Firing : महेश गायकवाडांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; रूग्णालयानं दिली 'ही' माहिती

त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा संघटनात्मक बळ देण्यासाठी आहे की सावंतांच्या उमेदवारीच्या शक्ती प्रदर्शनासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तानाजी सावंत यांनी जिल्ह्यात साखर कारखानदारीच्या माध्यमातून प्रवेश करत राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. सावंत यांचा सर्वधर्मीय विवाह सोहळा हा वर्षभरातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणून आजही चर्चिला जातो. परंडा तालुक्यातील भैरवनाथ कारखान्याच्या परिसरात दरवर्षी हा विवाह सोहळा पार पाडला जातो. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील दिग्गज मंडळी, सिने कलावंतांची हजेरी असते.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना आपलेसे करून घेण्यात सावंत यांना यशही आले होते. आता राज्यातील ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये सावंत आपली दुसरी इनिंग गाजवत आहेत. धाराशिव लोकसभा निवडणुकीची सगळी सूत्र आपल्या हाती राहावी, यासाठीही त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सावंत यांचे जाळे सध्या सर्व दूर पोहोचले आहे. सुरुवातीला परंडा येथील भैरवनाथ कारखाना त्यानंतर वाशी येथील शिवशक्ती कारखाना आणि आता मराठवाड्यातील सर्वात मोठा पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या तेरणावरही सावंत यांचेच नियंत्रण आहे.

Eknath Shinde Dharashiv
Nagar News : विवेक कोल्हेंनी भर बैठकीत अधिकाऱ्यांना झापलं; नेमकं काय घडलं?

तेरणा साखर कारखाना हा जिल्ह्याच्या राजकारणाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून मराठवाड्यात परिचित आहे. या ठिकाणीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदा येत आहेत. शिवसेनेचा पहिला कार्यकर्ता मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने सावंत गट जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीला लागला आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे खासदार ओम प्रकाशराजे निंबाळकर हेच उमेदवार असणार हे जवळपास स्पष्ट आहे. दुसरीकडे धाराशिवची जागा भाजप लढवणार अशा चर्चा जोर धरत असतानाच मुख्यमंत्र्यांचा बुधवारी होणारा दौरा हा शिवसेनेचा या जागेवरचा दावा पक्का करणारा ठरणार का? त्यात सावंत कुटुंबाकडेच उमेदवारी जाणार का? या प्रश्नांची उत्तरेही मिळण्याची शक्यता आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Eknath Shinde Dharashiv
Loksabha Election 2024 : पराभूत होणाऱ्या जागा भाजप मित्रपक्षांना देणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com