Eknath Shinde VS BJP  sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Politics : फायटर एकनाथ शिंदे! भाजपच्या आव्हानानंतरही ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये महापौर!

Mayor Election : महापौर पदाच्या निवडणुकीत ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना सत्ता कायम ठेवणार असल्याचे चित्र आहे. भाजपला उपमहापौर पदावर समाधान मानावे लागणार आहे.

Roshan More

Eknath Shinde News : महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना भाजपने घेरले होते. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंची युती होती मात्र भाजपकडून महापौर पदावर दावा सांगितला जात होता. कल्याण-डोंबिवलीमध्ये तर शिंदे शिवसेना-भाजपमध्ये टोकाचा संघर्ष देखील निवडणुकीच्या आधी पाहण्यास मिळाला. उल्हासनगरमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते.

महापालिकेच्या निकालामध्ये कल्याण डोंबिवली, ठाण्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत होते. दोन्ही ठिकाणी शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर, उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे महापौर पद शिवसेनेकडे जाणार हे निश्चित होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप काय निर्णय घेणार हे गुलदस्त्यात होते.

भाजपने शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली, ठाणे, उल्हासनगरमध्ये भाजपला उपमहापौर पद मिळणार आहे. तर, महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेकडे असणार आहे. शिवसेनेकडून ठाण्यात महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर या आहेत. तर, भाजपकडून उपमहापौर पदाचे उमेदवार कृष्णा पाटील असणार आहेत.

हर्षाली थवील यांना संधी

कल्याण डोंबिवलीमध्ये हर्षाली थवील-चौधरी यांना एकनाथ शिंदेंनी महापौर पदासाठी संधी दिली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर, उल्हास नगरमध्ये महापौर पदासाठी आश्विनी निकम यांना संधी देण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT