Mahesh Landge: दादा मला माफ करा! शोकसभेत हात जोडून महेश लांडगेंनी दिवंगत अजित पवारांची मागितली जाहीर माफी

Mahesh Landge: पिंपरी-चिंचवड शहरात अजितदादांच्या शोकसभेत लांडगे यांनी मागितलेल्या माफीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mahesh Landge_Ajit Pawar
Mahesh Landge_Ajit Pawar
Published on: 
Updated on: 

Mahesh Landge: भाजप आमदार महेश लांडगे यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हात जोडून जाहीर माफी मागितली. पिंपरी-चिंचवड शहरात अजितदादांच्या शोकसभेत लांडगे यांनी मागितलेल्या माफीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नुकत्याच इथल्या महापालिका निवडणुका पार पडल्या यावेळी प्रचारादरम्यान लांडगे आणि अजितदादा यांच्यामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. याची चांगलीच चर्चाही झाली होती. पण ते आरोप केवळ तेवढ्यापुरतेच मर्यादित होते, हे महेश लांडगे यांनी आजच्या कृतीतून दाखवून दिलं.

Mahesh Landge_Ajit Pawar
Sunetra Pawar: सुनेत्रा पवारच होणार उपमुख्यमंत्री! बारामतीहून मुंबईच्या दिशेनं रवाना

शोकसभेत नेमकं काय घडलं?

अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमाच्या सुत्रसंचालकांनी आमदार महेश लांडगे यांना मंचावर येऊन अजितदादांबद्दल दोन शब्द बोलण्याची विनंती केली. त्यानंतर लांडगे हे मंचावर आले आणि तिथं लावलेल्या अजितदादांच्या प्रतिमेला त्यांनी नमस्कार केला. त्यानंतर ते तसेच पुढे दोन शब्द बोलण्यासाठी पोडियमसमोर जाऊन उभे राहिले. यावेळी ते म्हटले, "उपस्थित शोकाकूल बंधु-भगिनींनो हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात जड अंतकरणानं आलेला आहे. मी उपस्थित सर्वांच्यावतीनं आणि माझ्या स्वतःच्या लांडगे परिवाराच्यावतीनं पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व नागरिकांच्यावतीनं मी दादांना भावपूर्व श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा"

Mahesh Landge_Ajit Pawar
BMC आयुक्तपदासाठी चर्चेत असलेल्या IAS मनिषा म्हैसकरांची बदली; मिलिंद म्हैसकरांकडे बांधकाम विभागाची अतिरिक्त जबाबदारी

दरम्यान, सर्वांच्यावतीनं अजित पवारांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी केवळ एकच वाक्य म्हटलं आणि ते म्हणजे 'दादा मला माफ करा' आणि मंचावरुन खाली निघून गेले. यावेळी त्यांना गहिवरुन आल्याचंही व्हिडिओमध्ये दिसून येतं. महेश लांडगेंच्या या कृतीमुळं सोशल मीडियावर त्यांचं अनेकांनी कौतुक केलं आहे. राजकारणात टोकाचे वाद झालेले असले तरी आता विनम्रपणे आपल्या विधानाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितल्याचं लोकांना भावल्याचं सोशल मीडियातील प्रतिक्रियांमधून दिसून आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.